Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आज कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन

Webdunia
शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (09:20 IST)
राज्यातील ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आज कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन, तर प्रत्येक महापालिका क्षेत्रात एका आरोग्य संस्थेत ड्राय रन घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यापूर्वी २ जानेवारीला पुणे, नंदुरबार, जालना, नागपूर या चार जिल्ह्यांत तसेच नागपूर व पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम राबविण्यात आली आहे.
 
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज लसीकरणाची ड्राय रन घेतली जाणार आहे. या मोहिमेसाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे. राज्यस्तरावरून जिल्ह्यांचे, तर जिल्हास्तरावरून आरोग्य संस्था आणि लसीकरण पथकांचे यूजर आयडी तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यांनी चाचणी लाभार्थ्यांची निवड करून ‘कोविन’ ॲपमध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपिंग करणे, चाचणी लाभार्थ्यांची माहिती कोविन पोर्टलवर अपलोड करणे, लाभार्थी व आरोग्य सेविकेचे सत्र स्थळ निश्चित करणे, लस वाटप व शीतसाखळी केंद्राला कळविणे, आरोग्य सेविकेला सत्राचा दिवस व वेळ कळविणे, लसीकरण अधिकारी १ ते ४ आणि पर्यवेक्षक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांना त्याची माहिती देणे आदी पूर्वतयारी करण्यात आली. यासंदर्भात बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
 
या ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर २५ लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल. कोविन ॲपवरील नोंदणीनुसार कक्षात सोडले जाईल. त्यानंतर माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाच्या माहितीची नोंद ॲपमध्ये करण्यात येईल. कोरोना लसीकरण सत्र आयोजित करताना कोरोनासंदर्भातील नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

महाराज त्यांना कधीही आशीर्वाद देणार नाही, अमित शहांच्या रायगड भेटीवर संजय राऊत यांचा टोला

तहव्वुर राणाला फाशी देण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले! आदित्य ठाकरे म्हणाले भारताने दहशतवादाविरुद्ध लढावे

LIVE: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ११ वाजता रायगड किल्ल्याला भेट देणार

केंद्रीय मंत्री अमित शाह पुण्यात पोहोचले, ११ वाजता रायगड किल्ल्याला भेट देणार

एफडीए विभागाने नागपूर जिल्ह्यात कारखान्यावर छापा टाकून ३० लाख रुपयांची सुपारी केली जप्त

पुढील लेख
Show comments