Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनाचा लहान मुलांना वाढता धोका लक्षात घेता बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार – मुख्यमंत्री

Webdunia
शनिवार, 8 मे 2021 (08:24 IST)
कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच कोरोनाची तिसरी लाट येऊच नये यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते.
 
लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेचा वेग मंदावता येईल. त्यामुळे लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. 18 ते 44 वयोगटातील 6 कोटी लोकसंख्या राज्यात आहे. त्यासाठी आपल्याला 12 कोटी डोस लागणार आहेत. एक रकमी हे सर्व डोस खरेदी करण्याची तसेच दिवसाला 10 लाख लोकांना लस देण्याची क्षमता महाराष्ट्राची आहे. त्यासाठी लस उत्पादकांसोबत चर्चा सुरू आहे. पण, लस पुरेसी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी सुविधा वाढवूनच तयारी करावी लागणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
 
गेले वर्षभर कोरोनाशी आपण लढत असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक सुविधा आपण उभ्या केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तत्परतेने आणि जलदगतीने सुविधा उभारण्याचे काम करत आहेत, याचे समाधान आहे. राज्यातील औषधांचा पुरवठा सुरळीत होईल पण सध्या महत्त्वाची गरज आहे ती ऑक्सिजनची. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील याची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी होत आहे. ही चांगली बाब आहे. राज्यात सध्या मिशन ऑक्सिजन राबविण्यात येत आहे. जिल्ह्याची गरज ओळखून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवावा. कोरोना नियंत्रणात आला तरी गाफिल राहू नका, हा विषाणू घातक आहे. सध्याचा म्युटेशनचा विषाणू हा जलदगतीने पसरत आहे. त्याच्यावर आपल्याला मात करावयाची आहे. माझे कुटुंब – माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून नक्कीच कोवीडवर मात करता येणार आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन लोकांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा व निधी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
 
सिंधुदुर्ग: ऑक्सिजन माहिती
जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे समर्पित कोविड रुग्णालय कार्यरत आहे. या रुग्णालयासाठी एक ऑक्सिजन जनरेशन प्लांट ( पीएसए) ५०० एलपीएम ( प्रतिदिनी ५८ जंबो सिलेंडर्स ७ क्युब मीटर) सप्टेंबर २०२० पासून कार्यरत आहे. दिवसेंदिवस वाढणारी कोविड १९ रुग्णांची संख्या व त्यांना लागणाऱ्या मेडीकल ऑक्सिजनची उपलब्धता होण्याकरिता शासनाने १ नवीन ऑक्सिजन जनरेशन प्लांट ( पीएसए) २०० एलपीएम ( प्रतिदिनी २१ जंबो सिलेंडर्स ७ क्युबीक मीटर) जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे दिलेला आहे. सदर प्लांट अॅबस्टीम कंपनीचा असून, २३ एप्रिल २०२१ रोजी प्राप्त झालेला असून, या प्लांटचे सर्व तांत्रिक जोडणीचे कामकाज पूर्ण होऊन कार्यान्वित करणेसाठी सज्ज झालेला आहे. या प्लांटमधील ऑक्सिजनचे नमुने तपासणी अहवाल गुणवत्तापूर्वक आलेले असून, आता रुग्णांना उपलब्ध करुन देण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. या प्रकल्पासाठी एकूण ७०.०० लक्ष ( सत्तर लक्ष) खर्च आलेल असून स्थापत्य, विद्युत कामासाठी रु.७.८० लक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेतून आणि १०० केव्हीए जनरेटर करीता रु. १५.०० लक्ष एवढा खर्च जिल्हा नियोजन समितीचे निधीतून करणेत आलेला आहे. या दोन्ही ऑक्सिजन जनरेशन प्लांटमुळे कोविड १९ रुग्णांना मेडीकल ऑक्सिजन रुग्णालयातच उपलब्ध झालेला आहे. प्रतिदिनी २० ते २५ कोविड १९ रुग्णांना व्हेंटीलेटरवर उपचार व ९० ते १०० रुग्णांना मेडीकल ऑक्सिजन थेरपीचे उपचार मिळत आहेत. जिल्हा नियोजन समितीने जिल्हा महिला रुग्णालय, कुडाळ, उप जिल्हा रुग्णालय सावंतवाडी व कणकवली या रुग्णालयांसाठी ३ नवीन ऑक्सिजन जनरेशन प्लांट ५०० एलपीएम क्षमतेचे एकूण रक्कम रु.२९७.६६ लक्ष मंजुर केलेले आहेत. सदर पैकी एक प्लांट या महिनाअखेर प्राप्त होऊन जिल्हा महिला रुग्णालय, कुडाळ येथे कार्यान्वित होईल.
 
मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज एण्ड अॅग्रीकल्चर पुणे यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ५० नवीन ऑक्सिजन कॉनस्ट्रेटर व ५ बायपॅप मशिन प्राप्त झालेली असून त्याचे वितरण आज करण्यात आले. जिल्हा खनिकर्म विकास प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांचे निधीतून नवीन ६ रुग्णवाहिका जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या आहेत व सदर योजनेतून ६ नवीन रुग्णवाहिका लवकरच प्राप्त होणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने दिले उत्तर

LIVE: पालघरमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप,गुन्हा दाखल

पालघरमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप,गुन्हा दाखल

मेंढरमध्ये लष्कराचे वाहन कोसळले पाच जवानांचा मृत्यू,अनेक जवान जखमी

पुढील लेख
Show comments