Marathi Biodata Maker

२७ वर्षाच्या लढाई नंतर वीरपत्नीला न्याय अंतिम टप्प्यात

Webdunia
सोमवार, 17 एप्रिल 2017 (19:24 IST)
दुसऱ्या महायुद्धात देशाची सेवा करणाऱ्या वीर जवानाच्या विधवा पत्नीला शासकीय यंत्रणा तसेच तिला मिळणाऱ्या पेन्शनसाठी २७ वर्षे दारोदारी भटकायला लावणाऱ्या महाराष्ट्र शासनाला अंतिमतः वीर पत्नी पेन्शनसाठी पात्र असल्याचे  उच्च न्यायालयात सांगावे लागले . पुढील २ आठवडयात प्रकरण निकाली काढून पेन्शनची रक्कम वीर पत्नीच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या न्या. अनुप मोहता व न्या. रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील तुळसाबाई गणपती सूर्यवंशी ह्या ७६ वर्षीय वृद्ध महिलेला १९९० साला पासून म्हणजेच गेल्या वीस वर्षापासून महाराष्ट्र राज्य व कर्नाटक राज्य सरकारे वीर जवानाच्या पत्नीला मिळणाऱ्या पेन्शनसाठी तांत्रिक कारणे काढून खेळवत असल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला. अंतिमतः कंटाळून ह्या वीर पत्नीने अॅड. धैर्यशील सुतार यांचे मार्फत उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावून याचिका दाखल करत दाद मागितली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

पाकिस्तानमध्ये लग्न समारंभात आत्मघातकी हल्ला, ७ जणांचा मृत्यू

बीएमसी महापौरपदाची निवडणूक लांबणीवर, शिवसेना-भाजप गटांना नोंदणीचा ​​फटका

अमेरिकेत एका भारतीयने आपल्या पत्नी आणि तीन नातेवाईकांवर गोळ्या झाडल्या, मुलांनी कपाटात लपून प्राण वाचवले

भयंकर! ५० पर्यंत अंक येत नसल्याने पोटच्या ४ वर्षांच्या चिमुरडीची पित्याने केली हत्या

या अर्थमंत्र्यांनी ५३ वर्षांची ब्रिटिश परंपरा मोडली; पूर्वी अर्थसंकल्प ५ वाजता सादर केला जात असे; नंतर वेळ बदलली

पुढील लेख
Show comments