दीक्षांत समारंभातील राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून राज्यभरात कोश्यारींविरोधात विरोधकांनी थयथयाट सुरु केला आहे. विरोधकच नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीन वंशजांनी सुद्धा यावरून संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या कार्यक्रमामध्ये कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली होती. यावरून राज्यपालांना केंद्राने बोलावून घ्यावे, राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवावे आदी मागण्या विरोधक करू लागले आहेत. या साऱ्या गदारोळात गडकरी यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) November 21, 2022
async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >
छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत या कॅप्शनखाली हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ''शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. आमच्या आईवडिलांपेक्षा देखील महाराजांवर आमची निष्ठा आहे. कारण त्यांचे जीवन आमचे आदर्श आहे. यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, जाणता राजा. निश्चयाचा महामेरू ! बहुत जनांसी आधारू ! अखंड स्थितीचा निर्धारू ! श्रीमंत योगी !! डीएड बीएड कॉलेज करणारा राजा नव्हता, वेळ पडली तर आपल्या मुलालाही कठोर शिक्षा देणारा राजा होता'', असे म्हणतानाचा व्हिडीओ गडकरी यांनी पोस्ट केला आहे.