Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डहाणू भूकंपात हादारले सात तासांत पाच वेळा भूकंप

dahanu
Webdunia
शनिवार, 2 फेब्रुवारी 2019 (19:08 IST)
मागील दोन महिन्यांपासून डहाणूत भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. या भूकंपामुळे नागरिक भयभीत झाले असून, दिवभरात सात तासांमध्ये पाचवेळा भूकंप झाले आहेत. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं, अशी भिती येथील स्थानिकांनी व्यक्त केली आहे.या भूकंप मालिकेत सर्वात मोठा धक्का हा ४.८ रिश्टर स्केलचा होता तर धक्क्यामुळे अनेक घरांना तडे देखील  गेलेत. जिल्हा परिषदेच्या शाळा सोडण्यात आल्या असून या भूकंपाचे हादरे तलासरीपर्यंत जाणवल्याने भितीचे वातावरण पसरले असून, डहाणू, तलासरी तर पुन्हा एकदा भूकंप जाणवला आहे. सकाळी ६ वाजून ५८ मिनिटांनी पहिला धक्का बसला, त्यानंतर सकाळी १०.०३ वाजता ३.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. तर १० वाजून २९ मिनिटांनी पुन्हा एकदा ३ रिश्टर स्केलचा हादरा जाणवला आहे. दुपारी २ वाजून ५ मिनिटांनीही ४.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. हे भूकंपाचे धक्के धुंदलवाडी, चिंचले, पारडी, हळदपाडा, आंबोली, सासवद येथील घरांना मोठे तडे गेले आहात. तर भूकंप झाल्याने कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून, जिल्हा परिषदेच्या शाळा देखील सोडली आहे. तर या धक्क्याने अनेकांच्या घरातील भांडी देखील पडली आहेत. यामुळे डहाणूत भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच या भूकंपाचा केंद्रबिंदू धुंदलवाडी असल्याने स्थानिकांनी घरांना कुलूप लावून स्थलांतर केलं आहे.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

जळगाव जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार, केंद्र सरकारने दिली मंजुरी

केंद्रीय गृहमंत्री रायगड किल्ल्यावर दाखल, छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली

LIVE: जळगाव जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार

पाकिस्तानला भूकंपाचा धक्का, लोक घराबाहेर पळाले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसमोर केली ही मोठी मागणी

पुढील लेख
Show comments