Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगातील सर्वात घाणेरड्या व्यक्तीचा मृत्यू, 60 वर्षांनंतर जबरदस्तीने अंघोळ घातली होती

Amou Haji
Webdunia
गुरूवार, 27 ऑक्टोबर 2022 (13:17 IST)
'जगातील सर्वात घाणेरडा माणूस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इराणच्या अमो हाजीचा मृत्यू झाला. हाजीने गेल्या 60 वर्षांपासून आंघोळ केली नव्हती. काही दिवसांपूर्वी त्याच्या गावातील लोकांनी आंघोळ घातली होती. त्यानंतर तो आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला.
 
अमो हाजी हा दक्षिण इराणमधील देजगाह गावचा रहिवासी होता. त्याला कोणीही नातेवाईक नव्हते. तो विटांनी तयार खुल्या झोपडीत एकटाच राहत होता. तरुणपणातील काही घटनांमुळे हाजीने पाणी आणि साबण न वापरण्याचा आग्रह धरला होता आणि आंघोळ केल्याने आजारी पडण्याची त्याला भीती वाटत होती. यामुळे हाजी जवळपास 60 वर्षे आंघोळीशिवाय राहिल्यानंतर गावकर्‍यांनी त्याला बळजबरी अंघोळ घातली होती.
 
हाजी रस्त्यावर वाहनांनी मेलेल्या प्राण्यांचे मांस खात आणि प्राण्यांच्या विष्ठेने भरलेल्या पाईपमधून धूर काढत होता. 2013 मध्ये हाजीच्या जीवनावर 'द स्ट्रेंज लाइफ ऑफ अमाऊ हाजी' नावाचा डॉक्युमेंट्री फिल्मही बनवण्यात आली होती.
 
काही आठवड्यांपूर्वी त्याच्या गावकऱ्याने त्याला स्वच्छ करण्याच्या उद्देशाने आंघोळ घातली होती. आंघोळ केल्यानंतर काही आठवड्यांनी त्याचा मृत्यू झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखलेंनी सांगितला कर्तव्याचा खरा अर्थ, जाणून घ्या

मुंबई पोलिस शाळांचे सुरक्षा ऑडिट करणार

सातवीच्या एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मोठा बदल

Maharashtra Day 2025 Wishes in Marathi महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

LIVE: मुंबईतील इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये भीषण आग

पुढील लेख
Show comments