Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराजस्व अभियानात संगमनेर उपविभागात २७ हजार दाखल्यांचे वितरण

Webdunia
शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (20:55 IST)
उपविभागीय अधिकारी कार्यालय संगमनेर यांच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘महाराजस्व अभियानात’ आतापर्यंत २७०१६ दाखले वितरित करण्यात आले आहेत. अशी माहिती संगमनेरचे उप विभागीय अधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी दिली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २०२२ मधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिये करिता आवश्यक असणारे कागदपत्रे काढताना येणाऱ्या अडचणी दूर होऊन, किमान कागदपत्रात व शासकीय शूल्क दरात प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देणेच्या हेतूने संगमनेर उपविभागातील संगमनेर व अकोले‌ तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने १३ डिसेंबर २०२१ पासून ‘महाराजस्व अभियान’ राबविण्यात येत आहे.
 
या अभियानात तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांच्या सहकार्यातून शाळा, महाविद्यालयातच शिबीर आयोजीत करण्यात आले होते. या शिबिरात उत्पन्नाचा दाखला- १५०३२, रहिवासी दाखला- ६७, वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र- ७१०२, अल्पभुधारक दाखला- १६८, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र नूतनीकरण – २, जातीचा दाखला- ३२५१, नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र- १२१९, ३३ टक्के महिला आरक्षण प्रमाणपत्र- ३१ व आर्थिक दुर्बल प्रमाणपत्र – १४४ असे एकूण २७०१६ दाखले वितरित करण्यात आले. सदर शिबीरामध्ये दाखले काढणे प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांना करिता यापुढील काळात देखील सदर अभियान सुरु राहणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. तसेच उपविभागामधील अनुसूचित जमातीच्या ज्या विद्यार्थ्यांकडे कागदपत्रांअभावी दाखले काढण्यास अडचणी येत असतील तर त्यांनी स्थानिक मंडळ अधिकारी / तलाठी यांचेशी संपर्क करावा. जेणेकरुन त्यांना दाखले उपलब्ध करुन देणेची कार्यवाही करता येईल. असे आवाहन ही श्री.मंगरूळे यांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Republic Day 2025 Wishes in Marathi प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2025

LIVE: आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दावोस दौऱ्यावर टोला

ऑस्ट्रेलियन ओपन 2024 च्या महिला आणि पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत कोणाचा होणार सामना जाणून घ्या

H-1B व्हिसाधारकांची मुले 21 वर्षांची झाल्यावर अमेरिका सोडावी लागेल, ट्रम्प यांचा धोरणाचा विरोध

दावोस दौऱ्यावर आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला

पुढील लेख
Show comments