Dharma Sangrah

पालेभाज्या महागल्याने ग्राहकांचा मोर्चा कडधान्यांकडे…..रिपोर्ट !

Webdunia
शनिवार, 22 जुलै 2023 (14:34 IST)
सध्या देशातील विविध राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. विशेषत उत्तर भारतात या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळं भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. याचा परिणाम भाज्यांच्या दरावर होत आहे. पावसामुळे पालेभाज्या सडत आहेत.

परिणामतः आवक कमी झाली असून, भाजीपाला चांगलाच भडकला आहे. भाजी करायची म्हटले तर गृहिणींचे टोमॅटोविना अजिबात भागत नाही. खरं तर टोमॅटोशिवाय भाजीला चवच येत नाही. मात्र सध्या टोमॅटोला सोन्याचे भाव आल्याने गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. यासोबतच भाजीपालाही महागल्याने बहुतांश ग्राहक कडधान्यावर भर देत, दुधावरची तहान ताकावर भागवित असल्याचे चित्र शहरात जागोजागी पाहायला मिळत आहे.
 
दरम्यान पालक, मिरची, सांबार, वांगे, फुलकोबी, पानकोबी, भेंडी, गवार, चवळीच्या शेंगा, शिमला मिरचीसह जवळपास सर्वच हिरव्या भाज्या महागल्या आहेत. मात्र सर्वाधिक भाव सध्या टोमॅटो खात आहेत. त्याच्या जोडीला अद्रकही भाव खात असून २८० रुपये किलो असा दर आहे.
 
बाजाराचा फेरफटका मारला असता, टोमॅटो १०० ते १२० रुपये प्रती किलो विकले जात आहेत. एरवी एक किलो खरेदी करणारे ग्राहक आता अर्धा किलोवर, तर अर्धा किलोवाले एका पावावर आले आहेत. आमचूर पावडर व लिंबू पर्याय म्हणून वापरू लागले आहेत.
 
दरवर्षी पावसाळ्यात भाजीपाला महागतो. मात्र यंदाही जास्त असल्याचे चित्र दिसत आहे. पूर्वीच्या तुलनेत निम्म्या भाजीपाला खरेदी करुनच लोक आपला व्यवसाय चालवत आहेत. अनेकजण महागड्या भाज्या खरेदी न करता कडधान्य, सोयाबीन, राजमा, बटाटे इत्यादींचा वापर करुन आपला खर्च भागवण्याचा प्रयत्न करत आहेत.

भाजीपाला आवाक्याबाहेर गेल्याने अनेकांनी आपला मोर्चा चना, तूर, मूग, उडीद, मसूर, कुळीथ, मटकी, बरबटीच्या डाळींसह चवळी, सोयाबीन, वटाणा या कडधान्याकडे वळवला आहे. आलू, कोहळे व अन्य एक-दोन भाज्यांचा अपवाद वगळता सध्या बहुतांश भाज्या ८० ते १०० रुपये किलोवर गेल्या आहेत. एवढ्या महाग भाज्या खरेदी करण्याची गोरगरिबांची हिंमतच होत नाही. भाजीपाला महाग झाल्यापासून असंख्य ग्राहक मोठ्या प्रमाणावर कडधान्य खरेदी करीत आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

कल्याण न्यायालयाने देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 8 बांगलादेशींना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली

LIVE: दारू दुकान उघडणे आता सोपे राहिलेले नाही उपमुख्यमंत्र्यांनी नवीन एनओसी नियम जारी केले

शाहरुख किंवा सलमान नाही, तर हा बॉलीवूड खान २०२५ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आला सेलिब्रेटी

गोरेगाव पश्चिम मध्ये चाळीत एलपीजी सिलेंडरचा स्फोट; 3 जण जखमी

लाजिरवाणी कृत्य; पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्याने महिला पत्रकाराला मारला डोळा, व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments