Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठरलं! फडणवीसांपाठोपाठ एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकलं, 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार

Webdunia
गुरूवार, 4 जानेवारी 2024 (20:47 IST)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी दौरा जाहीर झाल्यानंतर, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही  मैदानात उतरले आहेत. कारण एकनाथ शिंदे हे लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
 
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक आज पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभेच्या दृष्टीने महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्या दौऱ्याच्या तयारीनिमित्त या बैठकीत चर्चा झाली.
 
येत्या मार्च महिन्यापासून आचारसंहिता लागेल. त्यामुळे आपल्या हातात 60 दिवसच उरले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
 
दरम्यान "येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत केवळ राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष केवळ आणि केवळ आपल्याकडे असेल. आपण बाळासाहेब ठाकरेंचा विचार जपण्यासाठी वेगळ पाऊल उचलून, महायुतीचं सरकार स्थापन केलं. त्यामुळे आपण या निवडणुकीत झोकून देऊन काम करायचं आहे. महायुतीचं टार्गेट 45 प्लस आहे, ते गाठण्यात काही अशक्य वाटत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
 
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात येत्या 6 जानेवारीपासून होणार आहे.  यवतमाळ, वाशिममध्ये आणि रामटेक इथं 6 जानेवारीला पदाधिकारी मेळावा होईल.
 
 एकनाथ शिंदे यांचा राज्यव्यापी दौरा कसा असेल?
 
    ६ जानेवारी यवतमाळ, वाशिममध्ये आणि रामटेक मेळावा
 
    ८ जानेवारी अमरावती आणि बुलढाणा
 
    १० जानेवारी हिंगोली आणि धाराशीव
 
    ११ जानेवारी परभणी आणि संभाजीनगर
 
    २१ जानेवारी शिरूर आणि माव़ळ
 
    २४ जानेवारी रायगड रत्नागिरी सिधुदुर्ग
 
    २५ जानेवारी शिर्डी आणि नाशिक
 
    २९ कोल्हापूर ३० जानेवारी हातकंणगले
 
    पक्षाचं दोन दिवसाचं शिबीर  होणार आहे
 
 
या बैठकीत  मुख्यमंत्री म्हणाले, "ही जागा लढली, ती जागा सोडली अशा वेगवेगळ्या बातम्या मीडियातून, सोशल मीडियातून  येतील. पण आपण 48 जागा महायुती म्हणून लढायचं आहे. चार राज्यात निवडणुका झाल्या, त्यावेळी मीडियाने, विरोधकांनी काय काय वर्तवलं होतं. पण सगळ्यांचे अंदाज फोल ठरले. तीन राज्यात भाजप पूर्ण बहुमताने निवडून आलं. त्यामुळे कुठली जागा गेली, कुठली आली हे डोक्यात ठेवू नका, आपल्याला 48 जागा लढून महायुती म्हणून जिंकायच्या आहेत" असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

काँग्रेसने बंडखोर उमेदवार जयश्री पाटील यांची 6वर्षांसाठी हकालपट्टी केली

मुंबई पोलिसांनी ट्रक मधून 80 कोटी रुपयांची 8476 किलो चांदी जप्त केली

महाराष्ट्रात ट्रेन रुळावरून उतरवण्याचा कट,चाकात लोखंडी गेट अडकले

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक,आतापर्यंत 24 आरोपींना अटक

उदय सामंत पुन्हा रत्नागिरीतून विजयी होणार की उद्धव सेना जाणून घ्या समीकरण

पुढील लेख
Show comments