Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अडीच लाख ग्राहकांना मिळणार 'नवप्रकाश'

Webdunia
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 (10:21 IST)
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणने 'नवप्रकाश' योजना सुरू केली आहे. बारामती परिमंडलातील अडीच लाखांहून अधिक वीजग्राहकांना या योजनेत थकबाकीमुक्तीसोबतच नवीन वीजजोडणी घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 
 
३१ मार्च २०१६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या उच्च व लघुदाब वीजग्राहकांसाठी महावितरणने १ नोव्हेंबरपासून 'नवप्रकाश' योजना सुरू केली आहे. बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील ६३ हजार ३१८ वीजग्राहकांकडे ८० कोटी १२ लाख ४५ हजार रुपयांची मूळ थकबाकी, १३ कोटी १६ लाख ७ हजार रुपयांचे व्याज तसेच विलंब शुल्कापोटी १ कोटी ६० लाख २५ हजार रुपयांची थकबाकी आहे. सातारा मंडलात ३९ हजार ७१८ वीजग्राहकांकडे १२ कोटी ९६ लाख ८० हजार रुपयांची मूळ थकबाकी, १ कोटी ४२ लाख ६२ हजार रुपयांचे व्याज तसेच विलंब शुल्कापोटी २५ लाख ९४ हजार रुपयांची थकबाकी आहे. तर सोलापूर मंडलात १ लाख ४७ हजार ५६८ वीजग्राहकांकडे ७२ कोटी १७ लाख ९५ हजार रुपयांची मूळ थकबाकी, ११ कोटी ३५ लाख ४१ हजार रुपयांचे व्याज तसेच विलंब शुल्कापोटी १ कोटी ४४ लाख ३६ हजार रुपयांची थकबाकी आहे. बारामती परिमंडलांतर्गत बारामती, सातारा व सोलापूर या तिन्ही मंडलांत एकूण २ लाख ५० हजार ६०४ ग्राहकांकडे १६५ कोटी २७ लाख २० हजार रुपयांची मूळ थकबाकी, २५ कोटी ९४ लाख १० हजार रुपयांचे व्याज तसेच विलंब शुल्कापोटी ३ कोटी ३० लाख ५५ हजार रुपयांची थकबाकी आहे.
 
'नवप्रकाश' योजनेत येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा केल्यास त्यामध्ये ५ टक्के सूट दिली जाईल तसेच व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. १ नोव्हेंबर २०१६ ते ३१ जानेवारी २०१७ पर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ करण्यात येईल. तसेच १ फेब्रुवारी २०१७ ते ३० एप्रिल २०१७ पर्यंत मूळ थकबाकीसोबत २५ टक्के व्याजाच्या रकमेचा भरणा करावा लागणार असून, उर्वरित ७५ टक्के व्याज व १०० टक्के विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे. महावितरणच्या www.mahadiscom.inसंकेतस्थळावर संबंधित ग्राहकांच्या थकित देयकाचा तपशील व 'नवप्रकाश' योजनेत किती रक्कम भरायची याबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. थकबाकीची रक्कम धनादेशाद्वारेही स्वीकारली जाणार आहे. थकबाकीमुक्त वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरित नवीन वीजजोडणी देण्यात येईल. त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येणार आहे. तथापि, सुरक्षा ठेवीची रक्कम वर्षभराच्या वीजवापरानुसार आर्थिक वर्षात आकारण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी वीजग्राहकांनी महावितरणच्या संबंधित शाखा वा उपविभाग कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
 
पश्चिम महाराष्ट्रात पावणेसहाशे कोटींची थकबाकी
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ५ लाख ७० हजार ग्राहकांना या योजनेतून थकबाकीमुक्तीची संधी मिळणार आहे. त्यांच्याकडे ४७२ कोटी रुपयांची मूळ थकबाकी, ९८ कोटी ५८ लाख रुपयांचे व्याज तसेच विलंब शुल्कापोटी ४ कोटी ७३ लाख रुपयांची थकबाकी आहे. एकूण थकबाकी ५७५ कोटी ३१ लाख रुपये आहे. 
 
जुन्या नोटांनी व्हा थकबाकीमुक्त
वीजबिल भरण्यासाठी महावितरण येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारणार आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या घरगुती व वैयक्तिक ग्राहकांना जुन्या नोटा भरून थकबाकीमुक्त होण्याची ही सुवर्णसंधी आहे. तसेच ३० नोव्हेंबरपर्यंत मूळ थकबाकीत ५ टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी अधिक वेळ न दवडता आपली बिले भरावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे. बिल भरणा केंद्रांवर महावितरणचे कर्मचारी दिवसभर जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी ग्राहकांचे अर्ज भरून देण्यास सहकार्य करत आहेत. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments