Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वारकऱ्यांच्या गाड्यांना टोलमाफी, सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय

Webdunia
मंगळवार, 13 जून 2023 (20:44 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांच्या गाड्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टिकर्स पुरवा, असा आदेश सरकारने परिवहन विभागाला दिला आहे. वाहतूक पोलीस आणि संबंधीत आरटीओ यांच्याशी समन्वय साधून पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलीस चौक्यांमधून स्टिकर्स मिळणार आहेत. आरटीओ कार्यालयांमध्ये आजपासून स्टिकर्स उपलब्ध होणार आहेत. पंढरपूरला जातेवेळी आणि परत पंढरपूरहुन येतेवेळी वारकऱ्यांना टोलवसुलीत सवलत मिळणार आहे. वारकऱ्यांच्या वाहनांना 13 जून ते 3 जुलैपर्यंत टोलमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा टोलमाफीचा निर्णय मानाच्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या जड आणि वाहनांसाठी घेण्यात आला आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

‘अपूर्ण ज्ञान अधर्माला जन्म देते’, म्हणाले आरएसएस प्रमुख मोहन भागवत

अल्लू-अर्जुनच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत सीएम रेवंत रेड्डी यांचे वक्तव्य आले समोर

LIVE: पुण्यात फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना डंपरने चिरडले

मंत्रिमंडळ वाटपनंतर अजित पवारांचे वक्तव्य, म्हणाले काही मंत्री नाराज आहे

पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले

पुढील लेख
Show comments