Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जाची मुदतवाढ 31 ऑगस्ट पर्यंत -अजित पवार

Webdunia
बुधवार, 3 जुलै 2024 (09:20 IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेचा लाभ महिलांना मिळणार आहे. लाभार्थी महिलांना आता या योजनेसाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. लाभार्थी महिलांच्या योजनेला मिळणारा प्रतिसाद आणि लोकनिधींनी केलेली मागणीला लक्षात घेता या यायोजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून आता लाभार्थी महिलांना 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेत केली.या पूर्वी अजर करण्याची मुदत 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत होती आता मुदतवाढ करून महिलांना 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार.  

या योजनेसाठी अधिकाधिक महिलांना लाभ मिळावा या साठी योजनेच्या निकषांमध्ये काही सुधारणा आणि योजनेतील काही अटींना शिथिल करण्यात आले आहे.या योजनेत लाभार्थी महिलांना 1 जुलै पासून 1500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे.

या योजनेसाठी लाभार्थी महिलांना अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे सांगण्यात आले होते आता त्या ऐवजी 15 वर्ष पूर्वीचे रेशन कार्ड,मतदार ओळखपत्र, जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र या पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. 

या योजनेतील महिलांचे वयोगट 21 वर्ष ते 60 वर्ष ऐवजी आता 21 वर्ष ते 65 वर्ष करण्यात आले आहे. या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.  

परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील वास्तव्यास असणाऱ्या पुरुषाशी लग्न केले असल्यास पतीच्या जन्माचा दाखल,शाळा सोडल्याचे प्रमाण पत्र, अधिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार.अडीच लाख रुपयांचा उत्पन्नाचा दाखला नसल्यास जर कुटुंबाकडे पिवळे ,केशरी रेशनकार्ड उपलब्ध असल्यास उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली असून या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेचा उद्धेश्य राज्यातील दुर्बल घटकातील अधिकाधिक महिलांना आर्थिक मदत देणे आहे. 
 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन केले

छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत म्हणाले 132 जागा जिंकल्या तर मुख्यमंत्री भाजपचाच असावा

प्रेयसीची हत्या करून प्रियकराने मृतदेहाचे 50 तुकडे केले

सांगलीतील कृष्णा नदीच्या पुलावरून कार खाली पडल्याने पती-पत्नीसह तिघांचा मृत्यू

नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरत विचारले राज्यात सात टक्के मतदान कसे वाढले?

पुढील लेख
Show comments