Marathi Biodata Maker

उद्या एखाद्याला पोरगा झाला तरी माझ्यामुळेच झाला म्हणतील; फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली

Webdunia
सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 (08:46 IST)
उद्या कुणाचं लग्न झालं तर माझ्यामुळेच झालं म्हणतील. उद्या एखाद्याला पोरगा झाला तरी माझ्यामुळेच झाला म्हणतील. त्यामुळे ही प्रवृत्ती सोडा, अश्या कोपरखळ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिल्या आहेत. विकासकामांच्या श्रेयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलेच झापले आहे. मुंबईतील एका कार्यक्रम सभेत ते बोलत होते.
 
फडणवीस म्हणाले, मुंबईतील कोणताही प्रकल्प आम्ही हाती घेतला तर मीच हे काम केलं असा दावा केला आहे. जे लोक अडीच वर्षाच्या कार्यकाळात दोन वर्ष घरातच बसून होते, त्यांनी आम्हीच हे काम हाती घेतलं असं म्हणणं हस्यास्पद आहे. उद्या कुणाचं लग्न झालं तर माझ्यामुळेच झालं म्हणतील. उद्या एखाद्याला पोरगा झाला तरी माझ्यामुळेच झाला म्हणतील. त्यामुळे ही प्रवृत्ती सोडा अशी टीका फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
 
फडणवीस पुढे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय मला एक गोष्ट समजलीच नाही. आपण कोणतंही काम सुरू केलं तर काही लोक म्हणतात आमच्याच काळात झालं. अरे अडीच वर्षापैकी दोन वर्ष तर ते घरातच होते. दरवाज्याच्या आतच होते. अन् सहा महिन्यात त्यांनी मुंबई बदलून टाकली?, असा सवाल फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
 
ते पुढे म्हणाले, कोणतंही काम घेतलं तर आमच्याच काळात सुरू झालं असं सांगतात. काही लोकांची सवय अशी असते की, अरे याचा प्रवेश झाला मीच केला. अरे नोकरी लागली, मीच लावली. अरे लग्न झालं मीच जुळवून दिलं. अरे पोरगा झाला माझ्यामुळेच झाला. ही जी सवय आहे ती आता सोडली पाहिजे. आता पोरगा झाला हा त्याच्या कर्तृत्वाने झालाय. लग्न केलं तर त्याच्या पसंतीने केलं. मला वाटतंय, मीच केलं मीच केलं हे सांगण्याची ही प्रवृत्ती सोडली पाहिजे. अरे तुमच्या काळात काहीच झालं नाही. म्हणून तर ही मुंबईची अवस्था झालीय, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर केली आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईतील मानखुर्द येथे नवीन कारागृह बांधण्यात येणार

मुंबईत मराठी फलकांचा वाद चिघळला, बीएमसीकडून छोट्या व्यापाऱ्यांवर कारवाई

फडणवीस सरकारकडून महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल, ५२ आयपीएस,पोलीस दलातील ४४ अधिकाऱ्यांच्या बदल्या

हवामानात मोठा बदल, महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा, यलो अलर्ट जारी

CSK vs LSG: लखनौकडून चेन्नईचा सात गडी राखून पराभव

पुढील लेख
Show comments