Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसबीआयचा वेळखाऊ पण पीक कर्ज न भेटल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

एसबीआयचा वेळखाऊ पण पीक कर्ज न भेटल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
Webdunia
गुरूवार, 19 सप्टेंबर 2019 (10:15 IST)
सध्या राज्यात शेतकरीवर्गावर मोठे संकट आहे. अनेक शेतकरी कर्जापोटी व उत्पन्न न मिळाल्याने व दुष्काळाने होरपळून गेले आहेत. त्यात टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवत आहेत. मात्र बँकेच्या चालढकल मुळे एका शेतकऱ्याला त्याचा जीव गमवावा लागला असा आरोप होतो आहे. परभणी जिल्ह्यातील 4 गावांना कर्जमाफी मिळत नाही त्यामुळे शेतकरी उपोषण आंदोलन करत आहेत. या जिल्ह्यातील 65 वर्षीय शेतकऱ्याला पीक कर्ज न मिळाल्याने हृदय विकाराचा झटका आला व त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भीमराव चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव आहे. चव्हाण हे पाथरी तालुक्यातील देवेगाव या ठिकाणचे रहिवाशी होते. या घटनेमुळे बँकेवर संताप तर त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
भीमराव मागील  काही दिवसांपासून पाथरीच्या SBI बँकेत पीक कर्जासाठी चकरा मारत होते. मात्र त्यांना पीक कर्ज न मिळाल्याने ते खूप तणावात होते. यामुळे आज अचानक त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना पाथरी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यावेळी डॉक्टरांनी चव्हाण यांना मृत घोषित केले.यानंतर संतप्त झालेल्या चव्हाण कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह पाथरी येथील SBI बँकेतील शाखेत नेऊन ठेवला. बँक व्यवस्थापनाच्या वेळ खाऊ धोरणामुळे चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. पीक कर्ज घेताना शेतकरी वर्गाला अनेकदा बँकेतून अडणुकीला समोरे जावे लागते त्यामुळे शेतकरी मानसिक तणावात येतात. आता सरकार बँकेवर काय कारवाई करते हे पहावे लागणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हिंदू नववर्षानिमित्त फडणवीस सरकारने दिली मोठी भेट, १ एप्रिलपासून मिळणार स्वस्त वीज

LIVE: हिंदू नववर्षानिमित्त फडणवीस सरकारने दिली मोठी भेट

मुंबईत शास्त्रीय गायकाला १८ दिवस डिजिटल अटकेत ठेवत लुटले

कोकणात यलो अलर्ट, मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा इशारा

मुंबईत भीषण अपघात, टॅक्सी चालक आणि महिलेचा मृत्यू

पुढील लेख
Show comments