rashifal-2026

शेतकरी आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी तीन वर्षासाठी बळीराजा चेतना अभियान

Webdunia
गुरूवार, 2 ऑगस्ट 2018 (14:56 IST)
शेतकरी आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी करावयाच्‍या उपायोजनांतर्गत उस्‍मानाबाद व यवतमाळ दोन जिल्‍हयामध्‍ये बळीराजा चेतना अभियान हा पथदर्शी प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहे. शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी, शेतक-यांचे मनोबल उंचावण्‍यासाठी, त्‍यांच्‍यात जगण्‍याचा आत्‍मविश्‍वास निर्माण करण्‍यासाठी या दोन जिल्‍हयात तीन वर्षासाठी बळीराजा चेतना अभियान २४ जुलै २०१५ पासून राबविण्‍यात येत होते. या अभिनायाला राज्‍य शासनाने २०१८-१९ या एक वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. यासाठी १५ कोटी रूपयांच्‍या निधीची तरतूदही करण्‍यात आली. यासाठी जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मुदतवाढीचा प्रस्‍ताव शासनाकडे पाठविला होता.
 
या अभियानाच्‍या माध्‍यमातून विविध प्रकारच्‍या उपाययोजना राबविण्‍यात येत आहे. शेतकरी आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी बळीराजा चेतना अभियान हा विशेष मदतीचा कार्यक्रम राबविण्‍यांतर्गत यवतमाळ व उस्‍मानाबाद जिल्‍हयासाठी अनुक्रमे ७ कोटी ५० लाख असे एकून १५ कोटी रूपये निधीची तरतूद २०१८-१९ या वर्षासाठी करून या वर्षी अभियान चालू ठेवण्‍यास शासनाची मान्‍यता देण्‍यात आली आहे.
 
अभियानाच्‍या माध्‍यमातून ग्रामस्‍तरीय समित्‍यांमार्फत कृषी मेळावे, शेतीविषयक कार्यशाळा, प्रबोधनात्‍मक कार्यक्रम, पथनाटय असे विविध शेतक-यांचे मनोबल उंचावेल असे कार्यक्रम राबविण्‍यात आले होते. जिल्‍हयातील २०९६१ शेतक-यांना पेरणीकरीता मदत, आजापण व अपघात याच्‍या मदतीसाठी १०७२२ शेतक-यांना मदत, हातउसणवारी करीता बिनव्‍याजी कर्ज म्‍हणून ६६४५ अशी एकून ३८३२८ शेतक-यांना मदतीचा हात अभियानातून देण्‍यात आला होता.
 
तसेच लोकवर्गणीतून कर्करोगग्रस्‍त ३०० कुटुंबाना ३० लाख रूपये, १८ शेतकरी कुटुंबातील शेतकरी पाल्‍यांना एम.बी.बी.एसच्‍या प्रथम वर्षाची फि ४ लाख रूपये, मृत जनावरांकरीता ३६ शेतक-यांना मदत, शेतकरी पाल्‍यांना स्‍पर्धा परीक्षेकरीता मदत, १४२आत्‍महत्‍याग्रस्‍त कुटुंबांना ६० लाखांचे दुधाळ जनावरे वाटप करण्‍यात आली. याचा परीणाम म्‍हणून सन २०१५च्‍या तुलनेत २०१६ मध्‍ये ११४ टक्‍क्‍याने शेतकरी आत्‍महत्‍येत घट झाली होती. तर २०१७मध्‍ये ३० टक्‍क्‍याने घट झाली होती. या सर्व बाबींचा पाठपुरावा करून जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शासनाकडे या मुदतवाढीचा प्रस्‍ताव पाठविण्‍यात आला होता. या सर्वबाबीमुळे राज्‍य शासनाने बळीराजा चेतना अभियानाला सन २०१८-१९ या वर्षाकरिता मुदतवाढ देण्‍यात आली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नेदरलँड्सचे महापौर नागपूरच्या रस्त्यांवर त्यांच्या आईचा शोध घेत आहे; ४१ वर्षांपूर्वी या घटनेने केले होते वेगळे

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई, सागरी हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी बोटीला ताब्यात घेत ९ क्रू मेंबर्सना अटक

LIVE: 'निवडणुकीची शाई सॅनिटायझरने पुसली जात आहे', कुटुंबासह मतदान केल्यानंतर राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये ५२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले

धुळे येथे महापालिका निवडणुकीदरम्यान हिंसाचार, शिवसेना नेत्याच्या घरावर हल्ला

पुढील लेख
Show comments