Publish Date: Sat, 10 Aug 2019 (09:23 IST)
Updated Date: Sat, 10 Aug 2019 (09:30 IST)
सांगली महापुरामध्ये बचावकार्य करत असताना सैनिकांची बोट पलटी झाली. यामध्ये 7 ते 8 सैनिक आणि काही लोकही होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यातील सर्व सैनिक आणि पूरग्रस्त नागरिकांना वाचवण्यात यश आलं. कोल्हापूर रोड 100 फुटी कॉर्नरवरही घटना घडली. गंगानगरजवळून काही लोकांना रेस्क्यू केलं जात होतं. बोट पलटी होताच जवळून जात असलेल्या एनडीआरएफच्या जवानांनी पलटी झालेल्या बोटीतील सैनिकांना मदत केली.सायंकाळी 5.30 वाजता घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं. पुराच्या पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे सैनिकांची बोट पलटी झाली.