Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अतिथंडीमुळे गारठून चौघांचा मृत्यू

Four died due to extreme cold
Webdunia
बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (09:26 IST)
मागील काही काळापासून जळगावसह (Jalgaon) उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडत असल्याने जळगावमध्ये सोमवारी तापमानाचा पारा 7.5 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. अशात अतिथंडीमुळरे चार जणांचा बळी गेला आहे. रात्रीच्या सुमारास सुटलेले थंडगार वारे आणि अतिथंडीमुळे गारठून चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 
संबंधित चारही जण जळगाव शहरात भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवत होते. मृत चौघेही निराधार आणि बेघर आहेत. त्यामुळे ते रस्त्याच्या कडेला झोपले होते.  सोमवारी रात्री ते शहरातील विविध ठिकाणी मृतावस्थेत आढळले आहेत. यामध्ये एकाचा मृतदेह पांडे डेअरी चौकात, दुसऱ्याचा निमखेडी रस्त्यावर तर तिसऱ्याचा रेल्वे स्थानक परिसरात आढळला आहे. तसेच चौथ्या व्यक्तीचा मृतदेह सोमवारी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला आहे.
 
संबंधित चारही जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. याठिकाणी दाखल होताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चारही जणांना मृत घोषित केलं आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

कैलास मानसरोवर यात्रा जून ते ऑगस्टपर्यंत चालणार

शिवसेना मनसे युती होणार! शिवसैनिकांना केले मोठे आवाहन

पुणे : भाजप नेते जेपी नड्डा यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात घेतले दर्शन

भ्रष्टाचार प्रकरणात ब्राझीलचे माजी राष्ट्रपती कॉलर यांना तुरुंगवासाची शिक्षा

पुढील लेख
Show comments