Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पेनची मागणी केली आणि महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून पळाला

Webdunia
गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (14:33 IST)
नाशिक दुकानातील महिलेकडे नवीन पेनची मागणी केली आणि तो संबंधित महिलेच्या गळ्यातील आठ ग्रॅमची सोनसाखळी ओरबाडून पळाला. ही घटना आडगाव शिवारात घडली. यावेळी चोरट्याने गळ्यावर हात टाकताच महिलेने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो झटका देऊन पळून गेला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शरयू पार्क परिसरात असलेल्या ओमकार बंगल्यात एक छोटेसे किराणा दुकान आहे. सोमवारी (दि. ३) रात्री आठ वाजताच्या सुमारास मीनाक्षी दिनकर ठाणगे या नेहमीप्रमाणेच दुकानात बसलेल्या होत्या. यावेळी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एका संशयिताने दुकानात येऊन नवीन पेन मागितली. तेव्हा ठाणगे पेन काढण्यासाठी मागे फिरल्या असता, चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली. यावेळी साखळी अर्धी तुटल्याने त्याने अर्धा भाग सुमारे २० हजार रुपये किमतीचा घेऊन पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी झालेल्या झटापटीत फिर्यादी ठाणगे यादेखील जखमी झाल्या. त्यांच्या गालावर व डोळ्याजवळ दुखापत झाली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वार चोरांविरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

गया-हावडा एक्सप्रेसच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू

'त्यांचा गुन्हा काय आहे', अमेरिकेतून परत पाठवलेल्या भारतीय स्थलांतरितांच्या मुद्द्यावर भडकले काँग्रेस खासदार

जिथे दिसेल तिथे गोळी घाला, शिवाजी महाराजांवर टिप्पणी करणे अभिनेत्याला महागात पडले

LIVE: 75000 लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहने! सरकारला यादी मिळाली, आता नाव वगळले जाईल

वडिलांच्या मित्राने बलात्कार केला, अल्पवयीने ओळखल्यामुळे गळा दाबून खून केला

पुढील लेख
Show comments