Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारी कर्मचा-यांचा 14 डिसेंबरपासून संप

strike
Webdunia
सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 (08:45 IST)
मुंबई : सरकारच्या वेळकाढू भूमिकेमुळे तसेच सामान्य नागरिक, बेरोजगारांबाबत महत्वाच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने सरकारी कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने 14 डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे.
 
पुरेशी संधी देऊनदेखील सरकार निर्णय घेत नसल्याने संपाचा निर्णय घ्यावा लागत आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा कर्मचारी शिक्षक समन्वय समिती अध्यक्ष सुरेश पालकर यांनी अलिबाग येथील निर्धार सभेत केले आणि हा संप यशस्वी करण्याचा एकमताने निर्धार केला. जुनी पेन्शन योजना सर्वाना लागू करा, अशी प्रधान मागणी व इतर 17 प्रलंबित मागण्यांसाठी 14 मार्च 2023 पासून 20 मार्च 2023 पर्यंत कर्मचारी-शिक्षकांनी संप केला. राज्याच्या मुख्यमंत्री यांचा मान ठेवून कर्मचारी शिक्षकांच्या सुकाणू समितीने बेमुदत सुरू केलेला हा संप स्थगित केला.
 
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला सहा महिने उलटून गेले. जुनी पेन्शनसाठी नेमलेल्या अभ्यास समितीने तीन महिन्यांत अहवाल देणे अपेक्षित असताना मुदतवाढ घेऊनदेखील अद्याप शासनाकडून सदर समितीचा अहवाल जाहीर केला नाही. सरकारकडून कर्मचारी शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होत नाही. उलट शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत सेवा देणे हे सरकारचे कर्तव्य असताना सरकार यावरील खर्च कमी करून खासगीकरण व कंत्राटीकरण करू पाहात आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा सिजफायरचे उल्लंघन, किश्तवाडमध्ये जैश कमांडरसह 3 दहशतवादी ठार

LIVE: जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना धमकीचा ईमेल, डंपरखाली चिरडण्याची धमकी दिली

राजस्थान आणि बंगळुरू यांच्यातील सामन्यात, सॉल्ट आणि कोहली यांना आर्चरकडून कठीण आव्हान मिळेल

Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनचा एकमेकांवर युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना धमकीचा ईमेल, डंपरखाली चिरडण्याची धमकी दिली

पुढील लेख
Show comments