Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Gram Panchayat Election Results: नंदुरबार जिह्यात 28 ग्राम पंचायतीवर शिंदे गट विजयी

Webdunia
सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (19:41 IST)
ग्राम पंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज लागला असून नंदुरबार तालुक्यातील 75 ग्राम पंचायती पैकी 42 भाजप, 28 शिंदे, 1 राष्ट्रवादी तर 4 अपक्ष लोकनियुक्तांची सरपंचपदी निवड झाली. 
 
नंदुरबार तालुक्यातील 75 ग्रामपंचायतींसाठी निवडणुक प्रक्रिया सुरू होती. त्यात अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर 6 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. शिंदे गटाने सुतार, पाथ्री व वरूळच्या ग्राम पंचायतीवर तर देवपूर, नटावद आणि भवानी पाडाया ग्रामपंचायतीवर भाजपचा विजयी होण्याचा दावा होता. 18 सप्टेंबर रोजी ग्राम पंचायतीसाठी मतदान झाले त्याचा निकाल आज जाहीर झाला असून  ६९ ग्रामपंचायतीपैकी 39भाजपा, 25 शिवसेना (शिंदे गट), 4 अपक्ष तर 1 राष्ट्रवादी पक्षाचे लोकनियुक्त सरपंचपदी निवडून आले. 
 
अंबापूर, आष्टे, बालअमराई, ढेकवद, धिरजगांव, नवागांव, जळखे, काळंबा, पातोंडा, नागसर, श्रीरामपूर, शिरवाडे, वडझाकण, भांगडा, गुजरभवाली, मंगळू, मालपूर, लोय, निंबगांव, कोठली, पावला, शिवपुर, वागशेपा, वसलाई, चाकळे, व्याहूर, इंद्रहट्टी, वासदरे, नळवे बु., नळवे खुर्दे, सुंदर्दे, उमर्दे बु., खोडसगांव, पळाशी, कोळदे, शिंदे, गंगापूर, फुलसरे, नारायणपुर या ग्रामपंचायतीवर भाजपच्या उमेदवारांनी  विजय मिळवला आहे.

तर अजयपूर, बिलाडी, हरीपूर, पाचोराबारी, खामगांव, टोकरतलाव, विरचक, वाघाळे, आरर्डीतारा, धुळवद, निंबोणी, राजापूर, नंदपूर, वेळावद, भोणे, दुधाळे, दहिंदुले बु., दहिंदुले खु., पिंपरी, नांदर्खे, धमडाई, करजकुपे, लहान शहादा, होळतर्फे हवेली या ग्रामपंचयायतीवर शिंदे गटाचा विजय झाला आहे. 

नंदुरबार तालुक्यातील रनाळे खुर्दे, शेजवा, उमज, ठाणेपाडा येथील विजयी उमेदवारांनी अपक्ष निवडून आल्याचे सांगितले तर तालुक्यातील वाघोदा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा विजय झाला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

ODI जर्सी: हरमनप्रीतने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ODI जर्सीचे अनावरण केले

स्टेट रैंकिंग टेबल टेनिस चैंपियनशिप: लक्ष्य, शौर्य आणि साक्षी चॅम्पियन बनले

फेंगल समुद्रकिनाऱ्याकडे सरकले, तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

1 डिसेंबरपासून नियमात बदल होणार काय ते जाणून घ्या

Cyclone Fangal : समुद्रात लाटा उसळू लागल्या असून उड्डाणे रद्द, कुठे आहे धोका?

पुढील लेख
Show comments