Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

12 तास कीर्तनाचा रेकॉर्ड! 'वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया' मध्ये नोंद

Webdunia
गुरूवार, 16 जून 2022 (13:15 IST)
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील प्रसिद्ध कीर्तनकार, शिवचरित्र कथाकार ह.भ.प.बाजीराव महाराज बांगर यांनी नारायणगाव येथे सलग 12 तास 20 मिनिटांचे कीर्तन करून रेकॉर्ड कायम केले आहे. विशेष म्हणजे किर्तनाची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद केली आहे.
 
गेल्या 12 वर्षांपासून कीर्तन सेवा देणारे शिवचरित्र कथाकार ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेतली. पावनखिंडीच्या लढाईत 17  तास खिंड लढविणाऱ्या मावळ्यांची लढाई हीच त्यांच्यासाठी प्रेरणा ठरली. 17 तास मावळे लढाई करू शकतात, तर आपणही १२ तास कीर्तन करू शकतो असा निश्चय केल्यावर त्यांनी हा विक्रम गाठला.
 
तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील उपदेशपर प्रकरणातील 3 चरणाच्या अभांगवर समाज प्रबोधन करण्यासाठी त्यांनी विविध विषय निवडलले. व्यसन, छत्रपती शिवाजी महाराज, श्रीराम प्रभू, तुकाराम महाराज, मराठी भाषा सध्य स्थिती आदींचा यात समावेश होता.
 
महाराजांनी नारायणगाव येथील मुक्ताई मंगल कार्यालय येथे 14 जून रोजी सकाळी 9 वाजता तुकाराम महाराजांच्या उपदेशपर प्रकरणातील 3 चरणांचा अभंग घेत कीर्तनाला प्रारंभ केला. सलग 12 तास 20 मिनिटानंतर कीर्तन संपवून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नावं कोरले आहे.
 
या वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियासाठी हभप बाजीराव महाराज बांगर यांना किरण महाराज बनकर, माऊली महाराज कुंजीर, नितीन महाराज सुक्रे, विशाल महाराज बांगर, विठ्ठल महाराज पोपळघट, विठ्ठल जाधव (चोपदार) व चंद्रकांत निकम (विणेकर) यांच्यासह 22 जणांची साथ लाभली. याचबरोबर टाळकरी, गायक, वादक यांनीही साथ दिली.
 
वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर तुकाराम महाराजांचे दहावे वंशज माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे वतीने मेडल व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments