Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

१५ वर्षांपूर्वी नावाशिवाय जन्म नोंदणी झालेल्यांनी नावाची नोंदणी करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

१५ वर्षांपूर्वी नावाशिवाय जन्म नोंदणी झालेल्यांनी नावाची नोंदणी करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
Webdunia
शुक्रवार, 28 मे 2021 (21:29 IST)
राज्यातील ज्या नागरिकांची अथवा त्यांच्या पाल्यांची नावाशिवाय जन्म नोंदणी झाली आणि त्याला १५ वर्षे झाली आहेत अशांनी जन्म नोंदणीमध्ये नावाची नोंदणी करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
 
राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, ज्या नागरिकांची अथवा त्यांच्या पाल्यांची जन्म नोंदणी नावाशिवाय झाली व त्याला १५ वर्षे झाली असतील त्यांनी अशा जन्म नोंदणीमध्ये नावाची नोंदणी करून घ्यावी. यामध्ये सन १९६९ पूर्वीच्या जन्म नोंदणींचा देखील समावेश आहे.
 
नावाची नोंदणी दिनांक २७ एप्रिल २०३६ पर्यंत करता येणार आहे. त्यानंतर जन्म नोंदणीमध्ये बाळाच्या नावाची नोंदणी करता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी ज्या ठिकाणी जन्माची नोंदणी केली आहे तेथे नागरीकांनी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

अमरावती येथे कारखान्यात महिलांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

नागपुर : पतंग उडवणाऱ्यांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाईल, नायलॉन मांजा वापरल्यास होणार कडक कारवाई

गुजरातहून महाकुंभाला जाणाऱ्या ताप्तीगंगा एक्सप्रेसवर जळगावजवळ दगडफेक

LIVE: नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात

मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवताना काळजी घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जनहित पत्रक प्रकाशित

पुढील लेख
Show comments