रविवारपासूनच मुंबई, कोकणासह राज्यातील इतर भागांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. रविवारी काही वेळासाठी सूर्यनारायणाचं दर्शन झाल्यानंतर लगेचच काळ्या ढगांची चादर मुंबई आणि उपनगरांवर पसरल्याचं दिसून आलं. सायंकाळच्या सुमाराल या भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली.
कोकण किनारपट्टी भाग आणि उर्वरित परिसरातही पावसाचीउपस्थिती पाहायला मिळाली. तिथं रायगडमध्ये पावसानं चांगलाच जोर पकडला असून, अनेक गावांना याचा तडाखाही बसताना दिसत आहे. बंगालच्या खाडी परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाच्या मध्यम ते तीव्र स्वरुपाच्या सरी कोसळत आहेत.