Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात पावसाचा जोर; कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट, कुठे ऑरेंज अलर्ट?

Webdunia
बुधवार, 26 जुलै 2023 (14:58 IST)
हवामान खात्याने महाराष्ट्रातल्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे.आज 26 जुलै रोजी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे.
पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला असून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
 
पावसाची ही स्थिती अशीच पुणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत उद्याही अशीच स्थिती कायम राहाण्याची शक्यता आहे.
 
राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले
कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात गेल्या 24 तासांत सतत पाऊस झाल्यामुळे पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.
 
राधानगरी धरणाचे आतापर्यंत 4 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. आज 26 जुलै रोजी सकाळी 8.15 वाजता राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्रमांक 6 उघडले. नंतर तीन दरवाजे उघडण्यात आले.
 
धरणातून 7112 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
 
आता या एका दरवाज्यातून 1428 आणि पॉवर हाऊसमधून 1400 असा एकूण 2828 क्युसेक्स विसर्ग सुरू झाला आहे. आज सकाळी पंचगंगेच्या पाण्याची पातळी राजाराम बंधारा येथे 40.04 फुटांवर पोहोचली होती. धोक्यची पातळी 43 फूट इतकी आहे.कोल्हापूरच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली आहे. जिल्ह्यातले सर्व 82 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
 
काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी कोल्हापूरातील परिस्थितीबद्दल बोलताना म्हटलं की, राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले. 6 दरवाजे उघडले तर 2019 सारखी परिस्थिती होईल. अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडले तर स्थिती गंभीर होईल कर्नाटक सरकारशी यासाठी बोलावं लागेल.
 
त्यांनी पुढे म्हटलं की, कर्नाटक सरकारशी चर्चा कशी होतेय ते माहिती नाही अलमट्टीचं नियोजन योग्य पद्धतीने केलं तर परिस्थिती गंभीर होणार नाही.
 
हवामान विभागाचे संचालक के एस होसाळीकर यांनी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुढच्या 48 तासात ते अधिक तीव्र होणार असल्याची माहिती मंगळवारी (25 जुलै) ट्वीट करून दिलेली आहे.
 
महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होत असताना नाशिक जिल्ह्याला मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी नाशिक जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.जिल्ह्यात 62 टक्के खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, त्यांनाही पावसाची प्रतिक्षा आहे.
 
तळकोकणात जोरदार पाऊस सुरू आहे, सिंधुदुर्गातले तिलारी धरण भरून वाहू लागलं आहे. काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. कोल्हापूर-सिंधुदुर्ग महामार्गावर पाणी आल्याने हा रस्ता काहीकाळ बंद करण्यात आला होता.जळगाव जिल्ह्यातही मुसळधार पाऊस होत आहे. इथल्या अहिरवाडी क्षेत्रातल्या ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. इथल्या नागमोडी नदीला पूर आला असून गावात पाणी शिरलं आहे.
 





Published By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईतील जुहू परिसरात चार बांगलादेशी नागरिकांना अटक

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या फडणवीसांशी असलेल्या जवळीकतेवर टीकास्त्र सोडले

शरद पवार खूप हुशार आहे, आरएसएसचे गुणगान गाण्यामागील हाच हेतू आहे, देवेंद्र फडणवीस यांनी केला खुलासा

राज्य आर्थिक संकटातून जात आहे, विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

आज मुंबई रामनामाने गुंजणार, श्री रामलला मूर्तीच्या स्थापनेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त धार्मिक विधींचे आयोजन

पुढील लेख
Show comments