Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बायको डिवोर्स घेणार असल्याने पतीने मारली गोदावरीत उडी

Webdunia
बुधवार, 29 डिसेंबर 2021 (08:30 IST)
नवरा बायको म्हटलं की भांडण आलंच, मात्र भांडणाचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. बायको फारकत घेणार म्हणून नवऱ्याने गंगेत अर्थात गोदावरीत उडी मारल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. दीपक अशोक परदेशी (वय ३०, रा. लेखानगर, सिडको) असे संबंधित नवऱ्याचे नाव आहे. यावेळी अग्निशमन दलाने रात्री उशिरापर्यंत दिपकचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. शेवटी अंधारामुळे शोध मोहीम थांबवावी लागली.
अधिक महिती अशी दीपक परदेशी आणि कोमल परदेशी हे दोघेही लेखानगर परिसरात राहतात. अनेकवेळा दोघांमध्ये खटके उडत होते. त्यामुळे दिपकची पत्नी थेट फारकत घेण्याचे सांगत होती. फारकत घेण्यावरून त्यांच्यात न्यायालयात वाद सुरू होते. दरम्यान या विषयावार बोलण्यासाठी दिपकने कोमलला रामवाडी पुलावर येण्यास सांगितले. यावेळी या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. वाद विकोपाला गेल्याने दीपकने शेवटी रागारागात गोदावरी नदीपात्रात उडी मारली.
दीपकने उडी मारल्याचे पाहताच बायको कोमलने आरडा-ओरडा केल्यानंतर नागरिक जमा झाले. काही नागरिकांनी पंचवटी अग्निशमन केंद्राला घटनेची माहिती कळवल्यानंतर पथक तातडीने घटनास्थळावर पोहचले. बोटीच्या सहाय्याने दीपक परदेशी यांचा शोध सुरू केला. शेवटी अंधार पडल्यामुळे हे शोधकार्य थांबण्यात आले. याप्रकरणी कोमल परदेशी यांनी मालेगाव स्टँड पोलीस चौकीत जाऊन सारा प्रकार सांगितला.
दरम्यान आजही अग्निशामन दलाच्या वतीने गोदावरी नदीपात्रात दिपकचा शोध गेहताला जात आहे. तर दिपकच्या मित्रांनी दीपकला पोहता येत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे दीपकने रागाच्या भरात गोदापात्रात उडी मारली असेल. कुठल्याही तरी बाजूने पोहत जाऊन बाहेर पडले असतील, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पंतप्रधान आणि व्हीव्हीआयपींसाठी रस्ते आणि पदपथ मोकळे केले जातात, मग प्रत्येकासाठी का नाही- मुंबई उच्च न्यायालय

शाळेतील गुड टच-बॅड टच सत्रादरम्यान अल्पवयीन मुलीने शिक्षकाला सांगितले वडील, काका आणि चुलत भावाने केले लैंगिक अत्याचार

महाराष्ट्रात पावसाला जबरदस्त जोर!

IND vs AUS: सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी,प्लेइंग 11 जाणून घ्या

98 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांनी नोकरी गमावली ! Apple, Google, Microsoft यासह 330 टेक कंपन्यांमध्ये छाटणी

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रच्या राजनीतीमध्ये राज ठाकरेंच्या मुलाची एंट्री, जात-पातीला घेऊन MNS प्रमुख काय म्हणाले?

महाराष्ट्रात बुलढाणा मध्ये मिळली 'शेषशायी विष्णूंची' विशाल मूर्ती

विधानसभेसाठी महायुतीचा फार्म्युला

‘या’ 14 जिल्ह्यांमधील रेशन कार्डधारकांना मिळणाऱ्या पैशांत वाढ होणार, नवीन निर्णय काय?

जुडवा मुली झाल्या म्हणून नाराज वडिलांनी, जमिनीमध्ये जिवंत गाडले

पुढील लेख
Show comments