Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमरावतीमध्ये कारागृहातील सुरक्षाव्यवस्था भेदून तीन कैदी पळाले

Webdunia
मंगळवार, 28 जून 2022 (15:47 IST)
अमरावतीच्या  मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षाव्यवस्था भेदून तीन कैदी पळून गेल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी पहाटे २ ते ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. साहिल अजमत कळसेकर (३३ रा. रत्नागिरी), सुमीत शिवराम धुर्वे (२२), रोशन गंगाराम उइके (२३), दोघेही रा. शेंदूरजनाघाट, अशी फरार झालेल्या कैद्यांची नावे आहेत. या तिन्ही कैद्यांना मध्यवर्ती कारागृहातील बरॅक क्रमांक १२ मध्ये ठेवण्यात आले होते. सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी देऊन हे कैदी बरॅक आणि तुरुंगाची भिंत ओलांडण्यात यशस्वी ठरले.
 
साहिल कळसेकर हा हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत होता, तर सुमीत धुर्वे आणि रोशन उईके हे बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरलेले कैदी आहेत. या कैद्यांनी तुरुंगाची भिंत कशी ओलांडली, याबाबत तुरुंग प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

नाशिक जिल्हयात वडील-मुलाने मिळून केली शेजाऱ्याची हत्या

LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सरकारला दिली शाबासकी, गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी केलेल्या आत्मसमर्पणाचे केले कौतुक

लज्जास्पद! रेल्वे स्थानकावर व्हीलचेअरसाठी 10 हजार रुपये आकारले

राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी आज केरळचे 23 वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली

पुढील लेख
Show comments