Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुचाकी चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; 29 दुचाकी जप्त

Webdunia
शुक्रवार, 10 मार्च 2023 (21:32 IST)
पुणे:पुणे जिल्ह्यातील विविध भागात दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या दोन म्होरक्यांसह नऊ जणांच्या टोळीस पुणे पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 10 लाख रुपये किंमतीच्या 29 दुचाकी जप्त केल्या आहेत.
 
अमोल नवनाथ मधे, विजय संजय मधे, संतोष उमेश मधे, संदिप सुभाष मधे, विकास साहेबराव मधे (सर्व रा. पारनेर, अहमदनगर), विजय विठ्ठल जाधव, सुनील वामन मेंगाळ, भारत पोपट मेंगाळ, मयुर गंगाराम मेंगाळ (सर्व रा. संगमनेर, अहमदनगर) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
 
पोलीस निरीक्षक शिळीमकर हे जिल्ह्यातील दुचाकी चोरांचा आढावा घेत असताना दुचाकी चोरी करण्याची वेळ, निवडलेली ठिकाणे, त्यासाठीचे येणारे-जाणारे मार्ग तसेच चोरटय़ांनी अवलंबलेली पध्दत याचा बारकाईने अभ्यास करत त्यांनी कारवाईसाठी प्रथम पुणे-नाशिक रस्त्याची निवड केली. त्यासाठी दोन पथकंही तयार केली. तपासादरम्यान या दोन पथकांनी आंतरजिल्हा टोळीच्या दोन म्होरक्यांसह नऊ जणांना जांबूत फाटा परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे व घरफोडी चोरीचे एकूण 26 गुन्हे उघडकीस आले असून, 10 लाख रुपये किंमतीच्या 29 मोटारसायकल जप्त केल्या आहेत.


Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments