Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जळगाव : मुलीने फडणवीसांना लावला पायाने टिळा, फडणवीस भावुक झाले

Webdunia
बुधवार, 28 जून 2023 (12:18 IST)
Photo - Devendra fadanavisTwitter
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी जळगावमधील दिव्यांग शाळेत भेट दिली. या वेळी त्यांना एका दिव्यांग मुलीने पायानं टिळा लावला. आणि पायानं ताट धरून औक्षण केले. या वेळी फडणवीस भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. 

त्यांनी सोशल मीडियावर एक ट्विट शेअर केले आहे. त्यांनी ट्विट मध्ये लिहिले  आहे. आजवर मला किती माता भगिनींनी ओवाळले आहे. कपाळी आशीर्वादरूपी टिळा लावला आहे पण आज माझा कपाळी टिळा लावला पण हाताने नव्हे तर पायाने हे बघून माझं मन भरून आलं. हे करताना दिव्यांग भगिनींच्या चेहऱ्यावर हास्य होत. 
तिच्या नजरेची चमक जणू नियतीला आव्हान देत असून म्हणत आहे '' मला कोणाची सहानुभूती नको. द्या नको, मी खंबीर आहे. तिला पाहून मी एवढंच म्हणालो ,ताई तू लढत राहा, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. 
<

आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा... हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं… pic.twitter.com/WF1X3ab7wA

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 27, 2023 >
 
 
 
या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले - "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!" 
 
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: युसूफ अन्सारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र मुघलांच्या अधिपत्याखाली आहे, भाजपच्या मानसिकतेवर आदित्य ठाकरेंचे मोठे विधान

आंध्र प्रदेशातील फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू

अमित शहांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची संजय राऊतांची मागणी, म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला

शरद पवार आणि अजित पवार सातारा येथील एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर

पुढील लेख
Show comments