Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल सादर

Webdunia
सोमवार, 18 डिसेंबर 2023 (20:44 IST)
राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करणे व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) समितीने तयार केलेला अहवाल राज्य शासनास सादर करण्यात आला. हा अहवाल न्या. शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला.
 
विधानभवनाच्या आवारात मंत्रिमंडळ कक्षात हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री  म्हणाले की, राज्यातील कुणबी- मराठा व मराठा- कुणबी जातीचा शोध घेऊन प्रमाणपत्र देण्याची पद्धत निश्चित करण्यासाठी नियुक्त न्या. शिंदे समितीने राज्य शासनाला अभिप्रेत असे कामकाज केले आहे. या समितीने मराठवाड्यासह राज्यभरातील मोडी, ऊर्दू भाषेतील नोंदी तपासून समितीने उत्कृष्ट काम केले आहे. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉ. भांगे यांनी समितीने आतापर्यंत केलेल्या कामकाजाची माहिती दिली.
 
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह काही आमदार, शासकीय अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल ३१ ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आला होता. त्यानंतर न्या. शिंदे समितीने आपला दुसरा अहवाल सादर केला.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

प्रियंका गांधी वायनाड मतदारसंघातून लढणार निवडणूक, राहुल गांधी रायबरेली राखणार

राज्य सरकार ने उपोषणाला बसलेल्या ओबीसी नेत्यांनी मांडलेल्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे -पंकजा मुंडे

राहुल गांधी रायबरेली तर प्रियंका गांधी वाड्रा वायनाडमधून निवडणूक लढवतील खरगे यांची घोषणा

वक्फ बोर्डाने हिंदू-आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा आरोप

प्राण्यांमध्ये जाणिवा असतात का, त्यांना ही भाव-भावना असतात का?

मुंबईतल्या 'या' काॅलेजमध्ये हिजाब, बुरखा, नकाबवर बंदी; 9 विद्यार्थिनींची कोर्टात धाव

मनोज जरांगेंनंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू, सरकारच्या शिष्टमंडळाकडून दोघांनाही 'हे' आश्वासन

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांशी मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

दिल्लीत होणार भाजपच्या बड्या नेत्यांची महत्त्वाची बैठक,पराभवानंतर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा होणार

EVM वादावरून प्रफुल्ल पटेल यांचा इलॉन मस्क यांना फुकटचा सल्ला देऊ नका म्हणत हल्लाबोल

पुढील लेख
Show comments