Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिरुपतीहून येणार नाही यंदा कोल्हापूरच्या अंबाबाईसाठी शालू

Webdunia
बुधवार, 20 सप्टेंबर 2017 (16:25 IST)
करवीर निवासिनी ही अंबाबाई आहे की महालक्ष्मी, हा वाद गेल्या काही वर्षांपासून रंगत आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या देवीला बालाजीकडून येणारा शालू नेसवण्याची परंपराच यंदा मोडित काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
करवीर निवासिनीला नवरात्रात तिरुपती बालाजी देवस्थानाकडून आलेला शालू नेसवण्याची परंपरा गेल्या 20 वर्षांपासून सुरु होती. मात्र कोल्हापूरची देवी ही अंबाबाई नसून महालक्ष्मी आहे, असं पुजाऱ्यानं म्हटल्याचा दावा भक्तांनी केला आहे. त्यामुळे यंदा कोल्हापूरच्या करवीर निवासिनीला तिरुपतीहून शालू येणार नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे.
 
अंबाबाईला महालक्ष्मी करण्याचं कारस्थान असल्याचा आरोप पुजाऱ्यांवर करण्यात येत आहे. महालक्ष्मी ही
विष्णूची पत्नी असून तिला दरवर्षी मानाचा शालू तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्टकडून येत होता. मात्र अंबाबाईचं महालक्ष्मीकरण थांबवण्यासाठी भक्तांनी ही प्रथा मोडण्याचं ठरवलं आहे.यापूर्वी तिरुपती देवस्थानाला पत्र लिहून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती नवरात्रौत्सवात शालू पाठवण्याची मागणी करत होतं. यावेळी मात्र देवस्थान समितीने तिरुपती देवस्थानाशी कोणताही पत्रव्यवहार केला नाही.
 
नवरात्र उत्सवासाठी यंदा भक्तांनी दान केलेल्या सोन्यातून पालखी तयार करण्यात आली आहे. तसंच देवीच्या पूजेवरुन पुन्हा कोणताही वाद होऊ नये यासाठी देवस्थान समितीकडून खबरदारी घेण्यात येत आहे. शास्त्रानुसारच देवीची पूजा बांधण्यात येणार असून नऊ दिवस मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असेल.
 
हरयाणातील सिरसामध्ये राम रहिमच्या डेरा सच्चा सौदाचे मुख्यालय आहे. मुख्यालयाच्या परिसरात 300 लोकांचे सांगाडे असल्याची माहिती पोलिसांना चौकशीतून मिळाली आहे. डेरा सच्चा सौदाची अध्यक्ष विपश्यना इन्सा आणि उपाध्यक्ष डॉ. पी. आर. नैन या दोघांनी हरयाणा पोलिसांच्या विशेष तपास पथकाला ही माहिती दिली. मृत्यूनंतर डेरा परिसरात अस्थी पुरल्यास मोक्ष मिळतो, अशी राम रहिमच्या अनुयायांची श्रद्धा आहे. त्यामुळे डेरा परिसरातील जमिनीखाली 600 लोकांचे सांगाडे आणि अस्थी आहेत, असे नैन याने पोलिसांना सांगितले. मात्र राम रहिमच्या अनुयायांची खरीच अशी काही श्रद्धा होती की यामधील काहींचे खून करुन त्यांचे मृतदेह पुरण्यात आले, याची चौकशी पोलीस करत आहेत.
 
राम रहिमच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांची हत्या करुन त्यांचे मृतदेह पुरले जायचे, असे आरोप डेऱ्याच्या माजी अनुयायांनी केले आहेत. मृतदेह पुरल्यानंतर त्याजागी झाड लावले जायचे. त्याबद्दल कुणाला समजू नये याची पुरेपूर काळजी घेतली जात होती. हे रहस्य कधीही जगासमोर येऊ नये यासाठी या भागात खोदकाम न करण्याचे आणि झाड न कापण्याचे आदेश देण्यात आले होते, असे आरोप राम रहिमच्या काही माजी अनुयायांनी या आधी केले आहेत.
 
विशेष तपास पथकाने सोमवारी विपश्यना इन्साची सुमारे सव्वातीन तास चौकशी केली. यावेळी डीएसपी कुलदीप बैनीवाल यांनी विपश्यनाला १०० हून अधिक प्रश्न विचारले. मात्र तिने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळेच तिची पुन्हा चौकशी केली जात आहे. विपश्यना आणि पी. आर. नैनने दिलेल्या उत्तरांमध्ये पोलिसांना विरोधाभास आढळून आला आहे. या दोघांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्यांना अटक केली जाऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments