Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिबट्याचा सात वर्षीय मुलावर हल्ला; वासरू केले फस्त

leopard
Webdunia
गुरूवार, 15 फेब्रुवारी 2024 (08:53 IST)
नाशिकरोड:- येथून जवळच असलेल्या चेहडी शिवारात सात वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
हल्ला केल्यानंतर बिबट्याने एका वासराला शिकार करून जवळपास दोन तास या भागात तो डरकाळ्या फोडत होता.
 
 नवनाथ शिवाजी माळी (वय 7, रा. सातपुते मळा, मळई भाग, चेहडी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. नवनाथ यास रात्री लघुशंका करायची असल्याने तो त्याच्या खोपी मधून बाहेर आला.
 
यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप मारली व त्याच्या उजव्या खांद्याला आपल्या तोंडात धरून जवळपास वीस फुटा पर्यंत ओढत नेले. त्याने जोरजोरात आरडा ओरड केल्याने त्याच्या आई, वडील, बहीण व भाऊ यांनी नवनाथच्या दिशेने धाव घेतली. आरडा ओरड ऐकून बिबट्याने त्यास सोडून तो अंधारात लपून राहिला.
 
काही वेळाने बिबट्याने शेजारील गोठ्यात बांधलेल्या एका वासराला आपली शिकार केली. मात्र निघून न जाता जवळपास दोन तास माळी यांच्या खोपीच्या आसपास डरकाळ्या देत होता. दारणा नदी किनार असल्याने व साधन नसल्याने नवनाथवर यावर रात्रभर घरगुती उपचार करून सकाळी बिटको हॉस्पिटल मध्ये दाखल केले.
 
वन विभागाला माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली
 वन परीक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी अनिल अहिराराव, विजय पाटील यांनी बिबट्याला जेरबंद करण्ासाठी पिंजरा लावला. नवनाथ याच्या उजव्या खांद्याला जबर जखम झाली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे बिटको हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

नाशिकात जाधव बंधूंच्या हत्येप्रकरणी एसआयटीने तपास तीव्र केला, 5 संशयितांना अटक

पहलगाम हल्ल्यातील दोषींना सोडणार नाही, पीडितांना न्याय मिळेल', पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये म्हणाले

LIVE: मुंबईत दोन गटांमध्ये हाणामारी,3 जण जखमी, दुकानांची तोडफोड

मुंबईत दोन गटांमध्ये हाणामारी,3 जण जखमी, दुकानांची तोडफोड

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांची तुरुंगात प्रकृती बिघडली, उपचार सुरू

पुढील लेख
Show comments