Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रेयसीच्या खूनप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

Webdunia
गुरूवार, 18 जानेवारी 2024 (08:41 IST)
नाशिक: परप्रांतिय प्रेयसीसमवेत सिन्नरमध्ये राहत असताना, तिच्या चारित्र्यावर संशय घेत गळा आवळून खून केल्याप्रकरणातील आरोपीला मुख्य जिल्हा न्यायधीशांनी मरेपर्यंत जन्मठेप व १० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. २०१९ मध्ये सदरची घटना सिन्नर शहरात घडली होती.
 
दरवेश गेंदालाल चौरे (४०, मूळ रा. भोपाळ) असे आरोपीचे नाव आहे. सिन्नर पोलीसात दाखल फिर्यादीनुसार, रेखा मेहरा (रा. भोपाळ) हिच्याशी आरोपी दरवेश याचे प्रेमसंबंध होते. रेखा विवाहित व तिला एक मुलगी रिया होती.
 
दोघींना घेऊन तो सिन्नरमध्ये राहण्यास आला होता. संजीवनी नगरमध्ये भाड्याच्या खोलीत ते राहत होते. मात्र दरवेश हा रेखाच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यातून त्यांच्या सतत वाद व्हायचे.
 
२१ सप्टेंबर २०१९ रोजी आरोपी दरवेश याने झालेल्या वादातून रेखाचा ओढणीने आवळून तिचा खून केला. त्यानंतर घराला कुलूप लावून पसार झाला होता. मुलगी रिया शाळेत आली असता तिने आईचा शोध घेतला पण ती मिळून आली नाही.
 
त्यामुळे पोलिसांना बोलावून दरवाजा उघडला असता, रेखा बाथरुममध्ये मृत आढळून आली. याप्रकरणी सिन्नर पोलिसात दरवेशविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
सदरील गुन्ह्याचा तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक एस.पी. पाटील, उपनिरीक्षक सुदाम एखंडे यांनी केला आणि दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायधीश एस.डी. जगमलानी यांच्यासमोर चालला.
 
सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. शिरिष कडवे यांनी १८ साक्षीदार तपासले. आरोपीविरोधात दोषसिद्ध झाल्याने न्या. जगमलानी यांनी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

भाजपच्या पोस्टरवरून एकनाथ शिंदे गायब, कांग्रेसने लगावला टोला

20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहील

ठाण्यातून निवडणुकीपूर्वी 13.26 कोटी रुपयांचे अवैध साहित्य जप्त

निवडणूक जिंकल्यास शरद पवारांच्या विधानसभेतील सर्व पदवीधरांचे लग्न लावून देण्याचे आश्वासन या उमेदवाराने दिले

हारिस रऊफने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास

पुढील लेख
Show comments