Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

युवकाच्या हत्येचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Webdunia
बुधवार, 23 जून 2021 (09:55 IST)
नागपुरात झालेल्या एका युवकाच्या हत्येचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात युवकाची नाग नदीत फिल्मी स्टाईलने हत्या करण्यात आली. ही हत्या होत असताना तिथे असलेल्या प्रत्यक्षदर्शीने हे व्हिडीओ चित्रण केले आहे. हत्या करून आरोपी पसार झाला आहे. हत्या झालेल्या युवकांचे नाव योगेश धोंगडे (३०) असे आहे. अनैतिक संबधातून योगशची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस उपायुक्त लोहित मातानी यांनी दिली. 
 
घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  दुपारी १२ वाजेच्या सुमारास योगेश धोंगडे हा त्याच्या शिवाजी नगर परिसरातील घरी आला होता. त्याच वेळी आरोपी गोलू हा त्याच्या अन्य काही साथीदारांना घेऊन त्याच्या घरात शिरला. यावेळी आरोपींनी योगेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी गोलूची पत्नी आणि आईदेखील धावत आल्या, त्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर योगेश हा शेजारी असलेल्या नाल्याकडे गेला असता, आरोपींनी योगेशवर चाकूने वार केले. जखमी अवस्थेमध्ये योगेश घराकडे आला, परिसरातील लोकांनी त्याला जवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान योगेशचा मृत्यू झाला. 
 
मृतक योगेशचे परिसरातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते, याबाबत आरोपींना समजले. यावरून योगेश आणि आरोपीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. महत्त्वाचे म्हणजे आरोपी गोलू आणि योगेश चांगले मित्र देखील होते. मात्र वादातून योगेशची हत्या करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments