Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

LIVE: बुधवार 4 डिसेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

Webdunia
बुधवार, 4 डिसेंबर 2024 (09:43 IST)
Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले आहे. महाराष्ट्र निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहे. नव्या मुख्यमंत्र्याबाबत महाराष्ट्रात सुरू असलेला सस्पेन्स आता संपणार आहे. आज मुंबईत भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होत असून, त्यात भाजपच्या नेत्याची निवड केली जाणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते मुंबईत पोहोचले आहे. त्यानंतर लगेचच महायुतीची बैठक होणार असून, त्यात महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होणार आहे. तसं पाहिलं तर आतापर्यंत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस आघाडीवर दिसत आहे तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे हेही मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....

09:51 AM, 4th Dec
मुंबईमध्ये आज महायुतीच्या विधीमंडळ पक्षाची मोठी बैठक, समोर येणार मुख्यमंत्रीपदासाठीचे नाव
महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबतचा सस्पेंस संपत नव्हता, आज 4 डिसेंबर रोजी या नावाचे अनावरण होऊ शकते. आज मुंबईत भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होत असून, त्यात भाजपच्या नेत्याची निवड केली जाणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते मुंबईत पोहोचले आहे. सविस्तर वाचा 
 

09:51 AM, 4th Dec
महाराष्ट्राला बसणार फेंगल वादळाचा तडाखा, 6 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
फेंगल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येत आहे. महाराष्ट्रात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना यलो अलर्टही देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. सविस्तर वाचा 
 

09:50 AM, 4th Dec
भाजप आलाय, मराठी बोलू नका मारवाडी बोला, महिलेच्या तक्रारीवरून मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला दिला चोप
महाराष्ट्रातील दक्षिण मुंबईतील गिरगाव येथील एका दुकानदाराने कथितपणे महिलेला मराठीऐवजी मारवाडीत बोलण्यास सांगितल्यानंतर, मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला चोप दिला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सविस्तर वाचा 
 

09:49 AM, 4th Dec
पुण्यात ऑडी कार चालकाने दुचाकीस्वाराला 3 किलोमीटरपर्यंत ओढत नेले, 3 जणांना अटक
पिंपरी-चिंचवड, पुणे येथे झालेल्या वादानंतर ऑडी कारच्या चालकाने मोटारसायकलस्वाराला कारच्या बोनेटला लटकवून तीन किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत खेचले. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. सविस्तर वाचा 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

सर्व पहा

नवीन

भाजप आलाय, मराठी बोलू नका मारवाडी बोला, महिलेच्या तक्रारीवरून मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला दिला चोप

महाराष्ट्राला बसणार फेंगल वादळाचा तडाखा, 6 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

मुंबईमध्ये आज महायुतीच्या विधीमंडळ पक्षाची मोठी बैठक, समोर येणार मुख्यमंत्रीपदासाठीचे नाव

एकनाथ शिंदे 5 डिसेंबरला घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

LIVE: शिंदे यांनी अखेर होकार दिला! महायुतीत मुख्यमंत्र्यांबाबत एकमत

पुढील लेख
Show comments