Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra HSC result 2018 : पुन्हा एकदा मुलींची बाजी

Webdunia
बुधवार, 30 मे 2018 (12:56 IST)

बारावीचा निकाल : पुन्हा एकदा मुलींची बाजी 

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या (एचएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ही सर्व माहिती मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली आणि निकाल घोषित केला. यावेळी बारावीचा 88.41 टक्के निकाल लागला असून,  मुलींनीच पुन्हा  बाजी मारली आहे. तब्बल 92.36 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून 85.24 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. 

या निकालात  कोकण विभागाने यंदाही आपली आघाडी आहे.  कोकण विभागातील तब्बल 94.85 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर सर्वात कमी निकाल (86.13 टक्के) नाशिक विभागाचा लागला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान ही परीक्षा झाली. राज्यातील सुमारे नऊ हजार 486 कनिष्ठ महाविद्यालयांतून परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. राज्यात 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. यात आठ लाख 34 हजार 234 विद्यार्थी, तर सहा लाख 50 हजार 898 विद्यार्थिनींचा समावेश होता.

 

शाखानिहाय निकालाची टक्केवारी...

विज्ञान शाखा- 95.85 टक्के

कला शाखा- 78.93 टक्के

वाणिज्य शाखा- 89.50 टक्के

व्यावसायिक अभ्यासक्रम शाखा- 82.18 टक्के

अपंग विद्यार्थ्यांचा निकाल- 91.78 टक्के

 

विभागनिहाय निकालाची टक्केवारी-

कोकण- 94.85 टक्के

कोल्हापूर- 91 टक्के

औरंगाबाद- 88.74 टक्के

पुणे- 89.58 टक्के

नागपूर- 87.57 टक्के

लातूर- 88.31 टक्के

मुंबई- 87.44 टक्के

अमरावती- 88.08 टक्के

नाशिक- 86 .13 टक्के.

 
कसा पाहाल निकाल? 
 
बारावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
 
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments