Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र हे ओमिक्रॉनचे सर्वाधिक प्रभावित राज्य, चार नवीन रुग्ण आढळले

Webdunia
गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (10:25 IST)
देशात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराची लागण होण्याच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूचे धोकादायक स्वरूप आता 11 राज्यांमध्ये पसरले आहे. बुधवारी, केरळमध्ये ओमिक्रॉन स्वरूप चार, महाराष्ट्रात चार, तेलंगणात दोन आणि पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एक अशा एकूण 12 रुग्णांची एका दिवसात पुष्टी झाली. त्यामुळे देशातील एकूण बाधितांची संख्या 73 झाली आहे.
 
भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7974 रुग्ण आढळले असून 343 लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
या 11 राज्यांमध्ये Omicron प्रकरणे
महाराष्ट्र हे ओमिक्रॉनचे सर्वाधिक प्रभावित राज्य आहे, जिथे आतापर्यंत एकूण 32 प्रकरणे आढळून आली आहेत. दुसरीकडे, राजस्थान 17 प्रकरणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय गुजरात (4), कर्नाटक (3), केरळ (5), आंध्र प्रदेश (1), तेलंगणा (2), पश्चिम बंगाल (1), चंदीगड (1), तामिळनाडू (1) आणि दिल्लीत (6) प्रकरणे आहेत.
 
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या नवीन प्रकार ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी राज्यात 8 नवीन ओमिक्रॉन बाधित आढळले. नंतर बुधवारी 4 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.  त्यामुळे राज्यात ओमिक्रॉन बाधितांची संख्या 32 झाली आहे. यात उस्मानाबाद जिल्ह्यात दोन, मुंबईत एक आणि बुलडाण्यात एका रुग्णाची नोंद झाली. यातील ३ रुग्णांचे लसीकरण झालेले असून यात एक महिला आहे तर तीन पुरुष रुग्ण आहेत. हे तिन्ही रुग्ण लक्षणेविरहित असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यातील उस्मानाबाद येथील एक रुग्ण शारजा येथून आलेला आहे. त्याच्या संपर्कातील व्यक्तीलाही लागण झाली आहे. बुलडाणा येथील व्यक्ती दुबई येथून परतलेला आहे तर मुंबईतील रुग्ण आयर्लंड येथून परतलेला आहे. या सर्वांना रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. देशात महाराष्ट्रामध्ये ओमिक्रॉनचे सर्वाधिक 32 रुग्ण आहेत.
 
कोणत्या राज्यात किती रुग्ण
महाराष्ट्र - 32
राजस्थान - 17
दिल्ली - 6
गुजरात - 4
कर्नाटक - 3
तेलंगण - 2
केरळ - 5
आंध्र प्रदेश- 1
चंदीगड - 1
पश्चिम बंगाल - 1
तामिळनाडू - 1
एकूण रुग्ण - 73

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईहून लंडनला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये इमर्जन्सी अलर्ट, विमान हवेत फिरते

पंखे वाले बाबा कोण ? 'लड्डू मुट्या' का होत आहे व्हायल ?

रेल्वे बुकिंग व्यवस्थेत मोठा बदल, आता किती दिवसांपूर्वी तिकीट बुक करता येईल जाणून घ्या

सरफराज-तालिब एनकाउंटर: बहराइच हिंसाचार प्रकरणातील आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: मनोज जरांगे पाटील फॅक्टर किती परिणामकारक ठरणार?

पुढील लेख
Show comments