Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra Vidhan Parishad Election Result:अकोला वाशिम बुलडाण्यात कमळ फुललं

Webdunia
मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (10:01 IST)
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी झाली. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे वंसत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. वसंत खंडेलवाल यांना 438 तर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना 328 मतं मिळाली आहेत.
 
गोपिकिशन बाजोरियांचा पराभव
अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली यामध्ये गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव झाला आहे. अकोला – बुलडाणा – वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना यंदा रंगला आहे.
 
वसंत खंडेलवाल विजयानं शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
भाजप आणि शिवसेना या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदा समोर आले होते. वसंत खंडेलवाल हे नितीन गडकरींचे निकटवर्तीय मानले जातात. वसंत खंडेलवाल यांचा तीन जिल्ह्यातील जनसंपर्क त्यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरला आहे. भाजपच्या वसंत खंडेलवाल यांच्या विजयामुळं मतमोजणी केंद्रावर जमलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. निराश झालेल्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र सोडलं आहे.
 
भाजपचा मोठा विजय 
शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया हे गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघाचे आमदार होते. गेल्या 18 वर्षापासून इथं भाजपच्या उमदेवाराचा विजय झाला आहे. शिवसेना भाजप यांची युती असल्यानं भाजपला तिथं यापूर्वी निवडणूक लढवता आली नव्हती. 18 वर्षानंतर भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे.
 
विधान परिषद निवडणूकीसाठी अकोला,वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील 22 मतदानकेंद्रावर मतदान घेण्यात आले होते. तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असलेल्या 822 मतदारांपैकी 808 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव करत वसंत खंडेलवाल यांनी विधान परिषदेत दिमाखात प्रवेश केला आहे. नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा येथील पराभवामुळं महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

कोल्हापुरात भाचीने पळून जाऊन लग्न केल्यावर मामाने समारंभाच्या जेवणात विष मिसळले

नवेगाव धरण आणि चांदपूर येथे नवीन पर्यटन निवास स्थानांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

LIVE: संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात नवे वळण

तिबेटमधील भूकंपानंतर चीनने मोठे पाऊल उचलले, माउंट एव्हरेस्टचे निसर्गरम्य क्षेत्र पर्यटकांसाठी बंद

सरपंच हत्या प्रकरणात नवीन वळण, संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजयने उच्च न्यायालयातून याचिका मागे घेतली

पुढील लेख
Show comments