Dharma Sangrah

दुष्काळी लातूरला परतीच्या पावसाचा दिलासा मांजरा धरणात वर्षभर पुरेल इतके पाणी

Webdunia
परतीच्या पावसाच्या भरोश्यावर लातुरकर जगतात. मागच्या वर्षी हा परतीचा पाऊस कुठे गेला कळाले नाही. पण तो यंदा उशिरा का होत नाही परतला. मागच्या काही दिवसात या पावसाने कमाल दाखवली आणि मांजरा धरणात ११.५६ दशलक्ष घनमीटर इतका साठा झाला. अजूनही आवक सुरुच आहे. ही आवक ३० दशलक्ष घनमीटरपर्यंत पोचली तर पुढच्या वर्षभर पाणी पुरेल. पण त्यात चोरी व्हायला नको असं पाणी पुरवठा विभागात काम करणारे तज्ञ सांगतात. 
 
वांजरखेडा, कारसा पोहरेगाव, वांगदरी बंधारे आधीच भरली आहेत. आज नागझरी बंधार्‍याची दारे उघडण्यात आल्याने साई बंधाराही भरला आहे. नागझरी बंधार्‍यातून लातुरला पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मांजरा धरणावरील वीज पुरवठा दोन दिवसांपासून खंडीत आहे. आजही तो नीट झाला नाही. कालचे पाणी आज येईल असे सांगण्यात आले पण आजचे पाणी उद्याही येईल याबाबत खात्री देण्यास कुणीही तयार नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

मीरा भाईंदरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून सोशल मीडियावर 'रेट कार्ड' टाकून लिलाव केला

LIVE: मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बची धमकी, बॉम्बशोधक पथक तैनात

पुण्यात 31.67 कोटी रुपयांचा बंदी घातलेला हुक्का साठा जप्त केला

मणिपूरमध्ये 3 आयईडी स्फोट, 2 जण जखमी

लक्ष द्या! बँक 5 दिवस बंद राहणार आहे

पुढील लेख
Show comments