Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनमाड : तीन लाईट, एक पंखा, बिल आलं तब्बल चार लाख रुपये; बांगडी विक्रेत्याला महावितरणचा ‘शॉक’

Webdunia
सोमवार, 29 मे 2023 (08:01 IST)
नाशिक वीजेचा पुरवठा करणाऱ्या महावितरण या सरकारी कंपनीचा भोंगळ कारभार अनेकदा समोर येतो. आताही असाच एक अजब प्रकार समोर आला आहे.शहरात हातगाड्यावर बांगड्या विकणाऱ्या विक्रेत्याला एक महिन्याचं तब्बल ४ लाख रुपयाचे वीज बील पाठविण्यात आले आहे. त्यामुळे
 
अनेकदा महावितरणच्या माध्यमातून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल आल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. मनमाड शहरातील असाच काहीसा प्रकार घडला आहे.
 
एका नागरिकाला एक महिन्याचे विजेचे बिल तब्बल चार लाख रुपयांपेक्षा जास्त आले आहे. हा कुणी कारखानदार किंवा हॉटेल व्यावसायिक नाही तर बांगडी विक्रेता आहे. बिल पाहिल्यानंतर बांगडी विक्रेत्याने देखील डोक्यावर हात मारुन घेतला आहे.
 
आज वीज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहे. अनेक कामे विजेवर केली जात असल्याने वीज ही आवश्यक असते. यासाठी ग्राहक दर महिन्याला महावितरणला बिल अदा करत असतात. मात्र अलिकडच्या वर्षात महावितरणकडून चुकीचे बिल पाठवणे, अवाजवी मीटर रीडिंग, मनमानी पद्धतीने लाईट बिल आकारणी करणे अशा अनेक घटनांमुळे ग्राहक त्रस्त आहेत. अशातच असाच काहीसा फटका नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात वास्तव्य करणाऱ्या बांगडी विक्रेत्याला दिला आहे. या बांगडी विक्रेत्याच्या घरात तीन लाईट आणि एक पंखा आहे असे असताना देखील त्यांना वीज महावितरणने त्यांना एक महिन्याचे तब्बल 4 लाख 5 हजार 490 रुपयांचे बिल पाठवले आहे. एवढ्या मोठ्या रकमेचे बिल पाहून त्यांना मोठा धक्का बसला.
 
अधिक माहिती अशी आहे की, मनमाड शहरातील सरदार पटेल रोडवर राहणारे इक्बाल शेख यांची शिवाजी चौकात बांगड्या विकण्याची छोटीशी टपरी असून त्यावर कुटुंबियाचा उदरनिर्वाह चालतो. घरात तीन लाईट आणि एक पंखा आहे. असे असताना देखील महावितरणने त्यांना एक महिन्याचे तब्बल 4 लाख 5 हजार 490 रुपयांचे बिल पाठवले आहे. एवढ्या मोठ्या रकमेचे बिल पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी महावितरणच्या कार्यालयात धाव घेऊन दर महिन्याला बील भरलेले असताना, माझी कोणतीही थकबाकी नसताना मला लाखो रुपयांचे बील का देण्यात आले अशी तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी चार लाखातून बिल कमी करुन त्यांना 2 लाख 13 हजार 360 रुपयाचे बिल देऊन तातडीने भरण्यास सांगितले.
 
वीज महावितरणची कमालच:
विशेष म्हणजे माझ्याकडे कोणतीही थकबाकी नाही मी दर महिन्याला विजेचे बिल भरलेले असताना देखील मला लाखो रुपयाचे बिल आल्याचे पाहून मला शॉकच बसल्याचे या व्यक्तीने सांगितले. मी गरीब व्यक्ती आहे, माझी थकबाकी नसताना इतके बिल कसे आणि का भरु असे म्हटल्यावर त्यांचे काहीही ऐकण्यात आले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय यानंतर करुन उलट माझ्या घरातील मीटर काढून नेण्यात आल्यामुळे कुटुंबियांवर अंधारात राहण्याची वेळ आली असल्याचे शेख यांनी सांगितले. दरम्यान याबाबत वीज महावितरण कार्यालयाशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.
 
Edited  By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments