उत्तर हिंदुस्थानात हवेचा दाब १ हजार ते १००२ हेप्टा पास्कल एवढा आहे. त्यामुळेच तेथे वादळाचे संकेत आहेत. दक्षिणेतही उष्माघातासारखी स्थिती आहे. याचाच अर्थ यंदा पाऊस लवकरच येणार असे हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले. पावसाचे दरवर्षीचे वेळापत्रक तसे ठरलेले असते. म्हणजे तो २५ मे रोजी अंदमानात येतो, १ जूनला केरळात आणि ७ जूनला कोकण-गोवा मार्गे महाराष्ट्रात दाखल होतो.
यंदा उत्तर हिंदुस्थानातील धुळीचे वादळ आणि दक्षिणेत वाढलेले तापमान यामुळे पाऊस २० तारखेलाच अंदमानात आणि २४ तारखेला बंगालच्या उपसागरात दाखल होईल असा अंदाज ‘स्कायमेट’ या हवामान अभ्यासक संस्थेने म्हटले आहे. केरळमध्ये १ जूनला येणारा पाऊस २८ मे रोजीच अवतीर्ण होईल, असेही स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले.
पावसाचे वेळापत्रक
अंदमान – २० मे
केरळ – २८ मे
कोकण – ०४ जून