Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तब्बल १२ बळी घेणाऱ्या चौकात नाशिक महापालिकेकडून उपाययोजना सुरू

Webdunia
गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (14:54 IST)
नाशिक– शहरातील हॉटेल मिर्ची चौकात झालेल्या भीषण अपघातात तब्बल १२ जणांचा बळी गेला. त्यानंतर आता महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नांदूर नाका आणि सिद्धिविनायक लॉन्स चौकात महापालिकेकडून गतिरोधक आणि रम्बलर स्ट्रीपची उभारणी केली जात आहे.
 
नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील हॉटेल मिर्ची चौकात अनेक सुधारणा केल्या जात आहेत. नुकत्याच झालेल्या बस अपघाताच्या पार्श्वभूमिवर मनपाच्या बांधकाम विभागाने आज दि. 12 ऑक्टोबर रोजी गतिरोधक आणि खडखडाट पट्टीची (रंबल स्ट्रीप) बसविली आहे. तपोवन बाजुकडून मिर्ची चौक सिग्नल येथील डाव्या बाजुच्या रस्त्याच्या फॅनिंगचे काम सुरु करण्यात आले आहे.
 
उर्वरीत तीन बाजुंच्या फॅनिंगची कामे करण्यासाठी फॅनिंगमधील अनधिकृत व अतिक्रमित बांधकामे व शेड काढणेसाठी नगरनियोजन व अतिक्रमण विभागामार्फत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत, त्यातील काही लोकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढुन घेण्यास सुरुवात केली आहे. जे स्वतःहून अशी बांधकामे काढून घेणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. नाशिक महानगरपालिकेमार्फत तत्काळ उपाययोजने अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे, खड्डे बुजवण्यात आले आहेत, पॅच वर्क करण्यात आले आहे. या चौकात येणारी वाहनांचा वेग मर्यादित होणेयाच्या दृष्टीने औरंगाबाद रोडला जाऊन मिळणारा मनपाच्या रस्त्यावर गतिरोधक, रंबलर उभारण्यात येऊन अपघात प्रवण क्षेत्र आणि गतीरोधकाचा फलक लावण्यात आला आहे.
 
शहर अभियंता शिवकुमार वंजारी आणि कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांनी आज या सर्व कामांची पाहणी केली. लवकरच येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. रस्त्यावर दुभाजकही बांधला जाणार आहे. महावितरण अधिका-यांनी आज डीपी बसवण्याबाबत पाहणी केली. मनपाच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी मंगळवारी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली होती. नांदूर नाक्यावरुन येणा-या महामार्गाच्या बाजूला सिग्नजवळचे विद्युत रोहित्र हटवण्याबाबत अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. तसेच अतिउच्च दाबाच्या वीज वाहिन्या भूमिगत करण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे.
 
इतर चौकांमध्येही सुधारणा
महत्वाची बाब म्हणजे मिर्ची चौकाच्या धर्तीवर नांदूर नाका आणि सिद्धिविनायक लॉन्स चौकातही सुधारणा केली जाणार आहे. शहरातील इतर ब्लॅक स्पॉटबाबतही लवकरच कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे. दुसरीकडे नाशिक रोड विभागात बीएम मटेरीअलने रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच वीर सावरकर उड्डाणपूलवरही खड्डे बुजवून पॅच वर्क करण्यात आले आहे. एम. जी. रोडवरही खडी-डांबर टाकून (एमपीएम) खड्डे बुजवण्यात आले आहेत. आयुक्तांच्या निर्देशानुसार शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते दुरुस्तीची कामे दर्जेदार होतील याची काटेकोरपणे दक्षता घेतली जात आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

आईने आपल्या दोन निष्पाप मुलांची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली

Israel-Hamas War: 'गाझामधील मृतांची संख्या 44 हजारांच्या पुढे

पर्थ कसोटीपूर्वी रोहित शर्मा या दिवशी संघात सामील होणार

शिया मुस्लिमांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर बंदूकधाऱ्यांचा प्राणघातक हल्ला, 50 ठार

रोहित पवारांचा आरोप- भाजप सदस्यांचा EVM स्ट्राँग रूममध्ये शिरण्याचा प्रयत्न

पुढील लेख
Show comments