Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेगा नोकरभरती, शैक्षणिक भरतीला स्थगिती नाही

Webdunia
गुरूवार, 24 जानेवारी 2019 (16:51 IST)
मराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबरोबरच मेगा नोकरभरती आणि शैक्षणिक भरतीला स्थगिती देण्यास नकार दिला.
 
राज्य मागास प्रवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल तातडीने सादर करा, असा आदेश राज्य सरकारला दिला. हा अहवाल जसाच्या तसा जाहीर करायचा की नाही, ते 4 फेबु्रवारीला निर्देश दिले जातील, असे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने स्पष्ट करून, याचिकांवर अंतिम सुनावणी 6 फेब्रुवारीला निश्‍चित केली.
 
मराठा आरक्षणासंदर्भात जयश्री गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीने अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या जनहित याचिकेसह सहा याचिका उच्च न्यायालयात दाखल  झाल्या आहेत. त्यापैकी  चार विरोधात,  तर दोन याचिका समर्थन करणार्‍या आहेत. या याचिकांत हस्तक्षेप करणारे 22 अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी 16 अर्ज हे आरक्षणाचे समर्थन करणारे आहेत. त्यातच मेगाभरतीला विरोध करणारी याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शाळेतील गुड टच-बॅड टच सत्रादरम्यान अल्पवयीन मुलीने शिक्षकाला सांगितले वडील, काका आणि चुलत भावाने केले लैंगिक अत्याचार

महाराष्ट्रात पावसाला जबरदस्त जोर!

IND vs AUS: सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी,प्लेइंग 11 जाणून घ्या

98 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांनी नोकरी गमावली ! Apple, Google, Microsoft यासह 330 टेक कंपन्यांमध्ये छाटणी

महाराष्ट्रच्या राजनीतीमध्ये राज ठाकरेंच्या मुलाची एंट्री, जात-पातीला घेऊन MNS प्रमुख काय म्हणाले?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात बुलढाणा मध्ये मिळली 'शेषशायी विष्णूंची' विशाल मूर्ती

विधानसभेसाठी महायुतीचा फार्म्युला

‘या’ 14 जिल्ह्यांमधील रेशन कार्डधारकांना मिळणाऱ्या पैशांत वाढ होणार, नवीन निर्णय काय?

जुडवा मुली झाल्या म्हणून नाराज वडिलांनी, जमिनीमध्ये जिवंत गाडले

18वी लोकसभा सत्र सुरु, PM मोदींनी सांसद रूपात घेतली शपथ, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील घेतली शपथ

पुढील लेख
Show comments