Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

MH SET Admit Card 2023: MH SET चाचणी प्रवेशपत्र जारी

Webdunia
रविवार, 19 मार्च 2023 (10:48 IST)
महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी प्रवेशपत्र MH SET ऍडमिट कार्ड प्रसिद्ध झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) अधिकृत वेबसाइट unipune.ac.in वर 38वी MH SET परीक्षेचे हॉल तिकीट जारी केले आहे. जे उमेदवार परीक्षेला बसणार आहेत ते त्यांचा वापरकर्ता आयडी, नाव किंवा अर्ज क्रमांक टाकून MH SET हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात
 
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसाठी MH SET परीक्षा 26मार्च 2023 (रविवार) रोजी घेतली जाईल. परीक्षेच्या दिवशी उमेदवाराने सेट प्रवेशपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल. उमेदवारांनी आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रवेशपत्रासोबत त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र इत्यादी सारखे अतिरिक्त फोटो ओळखपत्र सोबत बाळगावे. त्याशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवाराने प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी ही प्रक्रिया अवलंबवावी.
 
MH SET प्रवेशपत्र 2023: महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा
 
* सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. म्हणजे https://setexam.unipune.ac.in/.
* होमपेजवर दिसणार्‍या लिंकवर क्लिक करा ज्यात 'लॉग इन करून प्रवेशपत्र डाउनलोड करा' किंवा 'अर्ज क्रमांकानुसार प्रवेशपत्र डाउनलोड करा' किंवा 'विद्यार्थ्याच्या नावाने प्रवेशपत्र डाउनलोड करा' असे लिहिले आहे. आता लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रदान करा आणि लॉगिन बटणावर क्लिक करा. आता प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. SET प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी सेव्ह करा.
 
महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत पेपर 1 आणि पेपर 2 असेल. पेपर 1 मध्ये 50 बहुपर्यायी प्रश्न असतील, प्रत्येकाला 2 गुण असतील. तर, पेपर 2 मध्ये 100 बहुपर्यायी प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा असेल. दोन्ही पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार.
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

अमरावती भीषण अपघातात 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

विजय वडेट्टीवारचा 26/11 हल्ल्यावर दुर्भाग्यपूर्ण जबाब, शहिदांचा अपमान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढील लेख
Show comments