Marathi Biodata Maker

खुशखबर! मिरज-कोल्हापूर पॅसेंजर उद्यापासून सुरू

Webdunia
गुरूवार, 14 एप्रिल 2022 (21:59 IST)
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली मिरज-कोल्हापूर आणि कोल्हापूर-मिरज पॅसेंजर रेल्वे सेवा गुरूवारी दि. 15 एप्रिलपासून पूर्ववत प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. मिरज-कोल्हापूर आणि कोल्हापूर-मिरज या पॅसेंजरच्या नियमित फेऱ्या सुरू होत आहेत. या पॅसेंजर रेल्वे गाडीमुळे मिरज-कोल्हापूर मार्गावर दैनंदिन प्रवास करणाऱया शेकडो कामगार, नोकरदार, उद्योग-व्यवसायिकांसह सामान्य प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.
 
सध्या कोरोना संसर्ग पूर्णत: नियंत्रणात आल्याने शासनाकडून बहुतांशी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. बहुतांशी रेल्वे सेवाही पूर्ववत होत आहे. निर्बंधातून मिळालेली शिथिलता आणि प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर-मिरज मार्गावर पॅसेंजर रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मिरज-कोल्हापूर (गाडी क्र. 01543) पॅसेंजर दररोज दुपारी 2.14 वाजता सुटून दुपारी सुटून 3.30 वाजता कोल्हापूरला पोहचेल. तर कोल्हापूर-मिरज पॅसेंजर (04544) दररोज सकाळी 10.30 वाजता कोल्हारातून सुटून दुपारी 11.45 वाजता मिरज जंक्शनवर पोहचले. या पॅसेंजर रेल्वेला जयसिंगपूर, तमदलगे, हातकणंगले, रुकडी, गांधीनगर (वळीवडे) या स्थानकांवर थांबे असतील. या रेल्वे गाडीमुळे सामान्य प्रवाशांसाठी नोकरदार आणि कामगार वर्गाची चांगली सोय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

जुना मोबाइल फास्ट करण्यासाठी करा हे काम

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीचे रणशिंग वाजणार; १६ जागांसाठी निवडणुका जाहीर

LIVE: 2 महिने नाशिकमधील रामकुंड परिसर बंद

रत्नागिरीच्या जंगल परिसरात २५ जिवंत बॉम्ब सापडल्याने घबराट पसरली

2 महिने नाशिकमधील रामकुंड परिसर बंद!

पुढील लेख