Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची एक कोटी ८० लाखांची फसवणूक, आमदार कोकाटेनी घेतली दखल

Webdunia
मंगळवार, 4 एप्रिल 2023 (21:32 IST)
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही दिवसांपूर्वी टोमॅटो व्यापारी शेतकऱ्यांचे सुमारे एक कोटी ऐंशी लाख रुपये घेऊन पसार झाल्याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार करत बाजार समिती प्रशासनास निवेदन दिले होते.त्यानंतर तक्रारदार शेतकऱ्यांसाठी सिन्नरचे आमदार ॲड.माणिकराव कोकाटे यांनी बाजार समिती सचिवांची भेट घेतली असून प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देत शेतकऱ्यांना मदत करा, असे त्यांनी सांगितले आहे.
 
पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड येथे नाशिक तालुक्यासह सिन्नर, कळवण, दिंडोरी शहरालगतच्या खेड्यापाड्यातून टोमॅटो विक्रीसाठी येतात. टोमॅटो व्यापारी नौशाद फारुकी, समशाद फारुकी हे जवळपास १७९ शेतकऱ्यांचे १ कोटी ८० लाख रुपये घेऊन पसार झाले आहेत.
 
या प्रकरणात शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी आमदार ॲड. कोकाटे आणि समस्याग्रस्त शेतकऱ्यांनी मुख्य बाजार समितीतील सचिव अरुण काळे यांची भेट घेतली. आमदार कोकाटे आणि बाजार समिती सचिव अरूण काळे यांच्यात चर्चा होऊन ज्या व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांचे पैसे घेणे बाकी आहे, त्या व्यापाऱ्याचे बाजार समिती आवारात असलेले गाळे विक्री करत आलेल्या पैशातून समान हिस्से करत शेतकऱ्यांना वाटप करावे असे कोकाटे यांनी सांगितले.
 
दरम्यान, यानंतर कोकाटे यांनी बाजार समिती कार्यालयातूनच पोलीस आयुक्तांना फोनवरून घडलेल्या प्रकरणाबाबत हकीकत सांगितली. त्यावर पोलीस आयुक्तांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ पोलीस आयुक्तालयात पाठविण्याबाबत सांगितले असून कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन आमदार कोकाटे यांना दिले.

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: मालेगाव स्फोट प्रकरणाच्या सुनावणीचा निकाल देण्यापूर्वीच न्यायाधीशांची बदली

सोसायटीच्या लिफ्टमध्ये कुत्र्याला जाण्यापासून रोखले, मालकाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

बीड मशिदीत स्फोट प्रकरणी दोन्ही आरोपींवर UAPA लागू

मालेगाव स्फोट प्रकरणाच्या सुनावणीचा निकाल देण्यापूर्वीच न्यायाधीशांची बदली

मुंबईत निरोप भाषणाच्या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

पुढील लेख
Show comments