Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किरीट सोमय्या यांना अटक करा : मनसे

Webdunia
मंगळवार, 26 मे 2020 (21:57 IST)
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी नुकताच पोस्ट केलेला एक व्हिडिओ चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण थेट मुंबई पोलिसांनी दिलं. आता याच मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी खोट्या बातम्या पसरवल्याप्रकरणी सोमय्या यांना अटक करण्याची मागणी केली आहे. ट्विटवरुन खोपकर यांनी मुख्यमंत्री कार्यालय, मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करुन एक पोस्ट केली आहे.
 
अमेय खोपकर यांनी ट्विटवरुन पोस्ट करताना आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार खोट्या बातम्या पसरवणे गुन्हा असल्याचे म्हटले आहे. “आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५४ अंतर्गत खोटी माहिती पसरवणाऱ्याला एक वर्ष तुरुंगवास होऊ शकतो. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मार्च महिन्यात हा इशारा दिला आहे,” असं खोपकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पुढे त्यांनी याच कायद्याच्या आधारे किरीट सोमय्या यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. “मुंबई पोलिसांनी विनंतीवजा आवाहन आहे की या कायद्याचा आदर राखत किरीट सोमय्या यांना अटक करावी. त्यांचे सोशल मिडियावरील उद्योग लोकांनी बघितलेच आहेत. खोट्या बातम्या पसरवणे हा कायद्याने गुन्हा आहे हे सुद्धा लोकांना कळायला पाहिजे,” असं खोपकर यांनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री नाही, कॉमन मॅन म्हणून काम केले, मोदी-शहांचा प्रत्येक निर्णय मान्य-एकनाथ शिंदे

Russia-Ukraine War: युक्रेनने पुन्हा अमेरिकन क्षेपणास्त्रे डागली, रशियाचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला

Syed Mushtaq Ali Trophy: T20 मध्ये गुजरातच्या उर्विलने मोडला पंतचा विक्रम,सर्वात जलद शतक झळकावले

डोप चाचणीचा नमुना देण्यास नकार दिल्याने बजरंग पुनियावर4 वर्षांची बंदी घालण्यात आली

PAK vs SL: पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे श्रीलंकेचा संघ परतला

पुढील लेख
Show comments