Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर

Webdunia
शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (07:50 IST)
नाशिक  – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसाच्या खासगी दौऱ्यासाठी नाशिकला येणार आहेत. शनिवार आणि रविवार (१ व २ ऑक्टोबर) असा त्यांचा दौरा आहे. विशेष म्हणजे, दरवेळी मुंबईहून कारने नाशिकला येणारे राज हे प्रथमच विमानाने नाशिकला येणार आणि नाशिकहून मुंबईला विमानानेच परत जाणार आहेत.
 
शनिवारी १ ऑक्टोंबरला सकाळी ८.३० वा शिर्डी विमानतळावर खासगी विमानाने राज यांचे आगमन होणार आहे. शिर्डी येथे नाशिक येथील मनसे पदाधिकारी त्यांचे स्वागत करणार आहे. येथे श्री साई बाबा समाधी दर्शन घेऊन ते परत विमानाने ओझर विमानतळावर दुपारी ११.३० वाजता येणार आहे. येथे शहर अध्यक्ष व पदाधिकारी, विद्यार्थी सेना व महिला पदाधिकारी स्वागत करणार आहे. त्यानंतर ते ओझर विमानतळाहून नाशिक येथे एसएसके हॉटेल येथे येणार आहे. येथे रात्री मुक्काम करुन ते रविवार २ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८.३० वा श्री सप्तशृंगी गडावर देवीचे दर्शन घेऊन परत ओझर विमानतळ येथून रवाना होणार आहे. हा संपूर्ण दौरा हा खासगी असल्याची माहिती मनसे नेते पराग शिंत्रें यांनी दिली आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments