#अयोध्या #Ayodhya pic.twitter.com/rFbkDT9Is1
— Raj Thackeray (@RajThackeray) May 20, 2022 async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >मनसेने राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु केली होती. अनेक शहरांमधून अयोध्या जाण्यासाठी रेल्वेच्या बोग्यांची बुकींग करण्यात आले होते. राज ठाकरे अयोध्येत पोहोचण्यापूर्वी मनसे कार्यकर्ते जाणार होते. मात्र भाजपचे खासदार बृज भूषण यांनी राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीयांची माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांचा अयोध्या दौरा होऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. तसेच काही साधू संत यांनीही या दौऱ्यास विरोध आहे. बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनीही या दौऱ्यालाही विरोध केला होता.