Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसेने उधळून लावली निरुपम यांची सभा

Webdunia
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची घाटकोपरमधील सभा मनसेनं उधळून लावली आहे. घाटकोपरच्या संजय गांधी नगर परिसरात नालाबाधीत झोपडपट्टीवासियांसाठी निरुपम यांची पूर्वनियोजित सभा होती. याचवेळी सभेत घुसून मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
 
सभेच्या ठिकाणी निरुपम यांचं आगमन झाल्याबरोबर काही मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्याचबरोबर खुर्च्याही उचलून फेकल्या. तसेच  काही मनसैनिक थेट स्टेजवरच गेले. त्यामुळे त्यांच्यात आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली.यावेळी पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, यापुढे निरुपम याची प्रत्येक सभा उधळणार असल्याचंही मनसेकडून  सांगण्यात आले आहे . याप्रकरणी पंतनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

वानुआतुच्या पंतप्रधानांनी ललित मोदींचे पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले

LIVE: अजित पवार म्हणाले २४ लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य

तुम्ही कधीही उद्धव ठाकरे होऊ शकत नाही...फडणवीसांवर उद्धव ठाकरेंची टीका

महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत मंत्री शंभूराज देसाईंनी दिले अपडेट

Maharashtra Budget 2025 महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025-26 ठळक वैशिष्ट्ये

पुढील लेख
Show comments