Festival Posters

खा. सुप्रिया सुळे यांची मालाड येथील सभेत टीका

Webdunia
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017 (14:29 IST)
मुंबई निवडणुकीच्या तोंडावर सेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेंकावर तोंडसुख घेण्याची कोणतीही संधी सोडत नसून त्यांच्यातील हेव्यादाव्यांवर खा. सुप्रिया सुळे यांनी घणाघाती टीका केली. मालाड येथील सभेत सुप्रिया सुळे यांनी चौफेर फटकेबाजी करत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले. वॉर्ड क्र. ३८ वैभव बराडकर आणि वॉर्ड क्र. ४२ साठी धनश्री बराडकर यांच्या प्रचारार्थ मालाडमध्ये सुप्रिया सुळे यांनी सभा घेतली. यावेळी आमदार विद्या चव्हाण, आमदार हेमंत टकले, मुंबई प्रदेश युवती अध्यक्ष आदिती नलवडे , उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंह उपस्थित होते. शिवसेना-भाजपपेक्षा कोणत्याही सिरीयलमधले लोक कमी भांडत असतील, असा टोला सुळे यांनी लगावला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात की मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात खड्डे झालेत, तर मुख्यमंत्री म्हणतात की खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे ते कळत नाही, पण नेमका याच्याशी आपला संबंध काय हे लोकांनाच कळेनासे झाले आहे, असे सुळे म्हणाल्या. 
सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

LIVE: सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली

कराडमध्ये संशयावरून प्रेयसीने कुऱ्हाडीने केली प्रियकराची हत्या, आरोपी महिलेला अटक

२०२६ च्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचा पुढचा सामना या दिवशी खेळणार

वडोदरा आणि गांधीनगरसह सहा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी

Ajit Pawar's plane crash पत्नी सुनेत्रा पवार यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सीबीआय चौकशीची मागणी केली

पुढील लेख
Show comments